Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांना महिन्याभरात चार वेळा ताप, जाणून घ्या नवे हेल्थ अपडेट…

राजू श्रीवास्तव हे गेल्या एक महिन्यापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज रूग्णालयात दाखल करून राजू यांना तब्बल 32 दिवस होत असूनही राजू यांना यादरम्यान एकवेळ देखील शुद्ध आली नाहीयं.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांना महिन्याभरात चार वेळा ताप, जाणून घ्या नवे हेल्थ अपडेट...
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 9:15 AM

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्यावर गेल्या 32 दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरूयेत. राजू यांचे चाहते सध्या चिंतेत आहेत. चार ते पाच दिवसांपूर्वी राजू यांची तब्येत (Health) स्थिर असल्याची माहिती मिळत होती. मात्र, काल अचानकच राजू यांना ताप (Fever) आल्याची माहिती हेल्थ अपडेटमध्ये देण्यात आलीयं. यामुळे चाहते आता देवाकडे राजू श्रीवास्तव यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करतायेत. दोन दिवसांपासून राजू यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली नसल्याची माहिती काल देण्यात आलीयं.

इथे पाहा शत्रुघ्न सिन्हा यांनी शेअर केलेली पोस्ट

राजू श्रीवास्तव गेल्या 32 दिवसांपासून रूग्णालयात

राजू श्रीवास्तव हे गेल्या एक महिन्यापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. रूग्णालयात दाखल करून राजू यांना तब्बल 32 दिवस होत असूनही राजू यांना यादरम्यान एकवेळ देखील शुद्ध आली नाहीयं. आठ दिवसांपूर्वी बातम्या आल्या होत्या की, राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली असून त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला. मात्र, नंतर स्पष्ट झाले की, ही फक्त अफवा होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली

राजू यांच्यावर सध्या उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटर आहेत. त्यांचा बीपी, ऑक्सिजनची पातळी आणि शरीराची हालचाल सामान्य आहे. हीच यादरम्यान एक दिलासादायक बातमी आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनीही राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केलीयं. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केलीयं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.