AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD weather update : राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाकडून थेट अलर्ट जारी, पुढील 24 तास…

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी कमी अधिक बघायला मिळत आहे. अनेक भागात 6.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठा वाढत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने थंडीचा अलर्ट जारी केला आहे.

IMD weather update : राज्यावर संकट, भारतीय हवामान विभागाकडून थेट अलर्ट जारी, पुढील 24 तास...
cold weather
| Updated on: Dec 14, 2025 | 7:29 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी कहर करत आहे. गारठा सातत्याने वाढतोय. सकाळच्या वेळी थंडगार वारे वाहत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असून उत्तरेकडून शीत लहरी राज्यात दाखल होत आहेत. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. संपूर्ण डिसेंबर महिना थंडी अशीच कमी अधिक राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून येलो अलर्ट जारी केला. पुढील काही दिवस राज्यात हुडहुडी वाढणार स्पष्ट आहे.

पंबाज, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागात दिवसेंदिवस थंडीमध्ये वाढ होत असून तापमानात मोठी घट होत आहे. उत्तरेकडे थंडी वाढल्याने राज्यातही पारा घसरत चालला आहे. परभणी 6.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे 6.1 अंश, निफाड 6.3 अंश सेल्सिअस, जळगाव 7 अंश, नाशिक, पुणे, मालेगाव येथे 9 अंशांच्या कमी तापमान होते.

भंडारा, गोदिंया येथे 10 अंशपर्यंत तामानाची नोंद झाली. आहिल्यानगर, परभणी, निफाड आणि धुळे येथे थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. यासोबतच भारतीय हवामान विभागाने नाशिक, आहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदूरबार, सोलापूर आणि पुणे येथे थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. याठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमध्ये होत असलेल्या हिमवर्षामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे नाशिकचा निफाड तालुका गारठला.

सलग सहाव्या दिवशी निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा पाच ते सहा अंश सेल्सिअस दरम्यान बघायला मिळाला. रुई येथे 5.3 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणावा लागतोय कांदा विक्रीसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत. या थंडीपासून आधार मिळवण्यासाठी शेतकरी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. त्यामध्येच पुढील काही दिवसांमध्य थंडी वाढण्याचे संकेत आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा