AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Actress : ‘या’ मराठी अभिनेत्रीचं एका सिनेमानं पालटलं नशीब, पण ‘दृष्ट’ लागली; लेक पदरात अन् कॅन्सरचं निदान, वयाच्या 31व्या वर्षी…

Marathi Actress : या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला एका सिनेमानं प्रसिद्धी मिळाली. मात्र, अभिनेत्रीच्या नशिबाचे फासे फिरले अन् एक अत्यंत वाईट घटना घडली.

Marathi Actress : 'या' मराठी अभिनेत्रीचं एका सिनेमानं पालटलं नशीब, पण 'दृष्ट' लागली; लेक पदरात अन् कॅन्सरचं निदान, वयाच्या 31व्या वर्षी...
| Updated on: Oct 30, 2026 | 7:30 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले, ज्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. काही कलाकारांना अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळाली, मात्र दुर्दैवानं त्यांना फार काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करता आलं नाही. मराठी अभिनेत्री मुग्धा चिटणीस यांच्याबाबतीतही असंच घडलं. ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटातील ‘दृष्ट लागण्या जोगे सारे’ हे गाणं आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मात्र, वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या अकाली निधनानं मराठी मनोरंजनविश्वाचं मोठं नुकसान झालं.

‘माझं घर माझा संसार’ चित्रपटातून मिळाली ओळख

मुग्धा चिटणीस यांना खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांनी अभिनेता अजिंक्य देव यांच्यासोबत प्रमुख भूमिका साकारली होती. अभिनेत्री रीमा लागू यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली होती. या चित्रपटातील मुग्धा आणि अजिंक्य देव यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. चित्रपटातील ‘दृष्ट लागण्या जोगे सारे’ हे गाणं विशेष लोकप्रिय झालं. आजही हे गाणं ऐकलं की, अनेकांना या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांची आठवण येते. विशेष म्हणजे, या चित्रपटातून मुग्धा चिटणीस यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सहजसुंदर अभिनयानं आणि निरागस व्यक्तिमत्त्वानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मात्र, त्यांच्या अभिनय कारकिर्दीला पुढे फारसा वाव मिळू शकला नाही.

लग्नानंतर आयुष्याला मिळाली नवी दिशा

मुग्धा चिटणीस यांचं लग्न उमेश घोडके यांच्याशी झालं होतं. वैयक्तिक आयुष्यात त्या संसारात रमल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात गंभीर आजाराचं संकट आलं. त्यांना कर्करोगाचं निदान झालं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला. एका बाजूला संसार आणि दुसऱ्या बाजूला गंभीर आजाराशी लढा, अशा कठीण परिस्थितीला त्यांना सामोरं जावं लागलं. दुर्दैवानं, या आजारावर मात करण्यात त्यांना यश आलं नाही. 10 एप्रिल 1996 रोजी वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

निधनाच्या वेळी मुलगी होती अवघ्या पाच वर्षांची

मुग्धा चिटणीस यांच्या निधनातील सर्वांत वेदनादायी बाब म्हणजे, त्यावेळी त्यांची मुलगी ईशा अवघ्या पाच वर्षांची होती. आईचं छत्र हरपल्यानं तिच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. आईच्या निधनानंतर ईशा काही काळ आजी-आजोबांसोबत राहिली. पुढे ती वडील उमेश घोडके यांच्यासोबत अमेरिकेत राहायला गेली.

मुग्धा चिटणीस यांच्याबद्दल अनेकांना माहिती नसलेली बाब म्हणजे त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर उत्तम कथाकथनकारही होत्या. त्यांनी भारत आणि अमेरिकेत कथाकथनाचे अनेक कार्यक्रम सादर केले होते. काही वृत्तांनुसार, त्यांनी अशा प्रकारचे जवळपास 500 कार्यक्रम केले होते. आकाशवाणीच्या माध्यमातूनही त्यांनी विविध कार्यक्रम सादर केले.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान