Ramayana : रिलीज होण्याआधीच रणबीर कपूरच्या ‘रामायण’ला मोठा झटका, ‘या’ थिएटरमध्ये चित्रपट दाखवण्यास नकार
रणबीर कपूरच्या बहुचर्चित 'रामायण' चित्रपटाला रिलीजपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. डिस्ट्रिब्युटर्स आणि थिएटरमधील या वादामुळे मेकर्सच्या अडचणी वाढल्या आहेत.

अभिनेता रणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपट रिलीज होण्यास अवघे काहीच दिवस उरले आहेत. मात्र रिलीज आधीच चित्रपटाला मोठा झटका बसला आहे. बंगळुरूमधील प्रसिद्ध सिंगन स्क्रीन थिएटर असलेल्या विजय सिनेमाने हा चित्रपट आपल्या थिएटरमध्ये रिलीज न करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. थिएटर आणि फिल्म डिस्ट्रिब्युटर्स यांच्या दरम्यान कमाईच्या वाटपावरून म्हणेज रेव्हेन्यू शेअरिंगवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याच वादामुळे आता चाहत्यांना हा बिग बजेट चित्रपट सिंगल स्क्रीनवर पाहण्याची संधी मिळणार नाही.
कमाईच्या वाटपावरून मोठा वाद
यासंदर्भात विजय सिनेमाचं असं म्हणणं आहे की, ते कमाईच्या ठरावीक टक्केवारीनुसार रक्कम वाटप करण्याच्या पद्धतीने काम करतात. थिएटरच्या नियमानुसार चित्रपटाच्या कमाईतील ठरावीक हिस्सा हा डिस्ट्रिब्युटर्सना दिला जातो. ‘रामायण’चे डिस्ट्रिब्युटर्स मात्र या अटीवर चित्रपट रिलीज करण्यास तयार नाहीत, असं सांगितलं जात आहे. याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळे थिएटर व्यवस्थापनाने त्यांच्या सिनेमागृहात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्याही विशिष्ट चित्रपटाच्या विरोधात निर्णय नव्हे
यावर बोलताना थिएटर व्यवस्थापनाने असंही स्पष्ट केलं की, त्यांचा हा निर्णय एखाद्या विशिष्ट चित्रपटाच्या किंवा त्याच्या कथानकाच्या विरोधात नाही. यापूर्वीही विजय सिनेमाने काही मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत असाच कठोर पवित्रा घेतला होता. यामध्ये थलपती विजयचा ‘जन नायकन’ आणि यशचा ‘टॉक्सिक’ या चित्रपटाचाही समावेश आहे. थिएटर व्यवस्थापनाच्या सांगण्यानुसार, हे त्यांचे व्यावसायिक नियम असून प्रत्येक चित्रपटासाठी ते एकच धोरण अवलंबतात. त्यामुळे ‘रामायण’च्या प्रदर्शनाबाबत निर्माण झालेला हा वाद आता चिचर्चेचा विषय ठरत आहे.
दोन भागांत रिलीज होणार चित्रपट
नितेश तिवारीने दिग्दर्शित केलेला ‘रामायण’ चित्रपट भारतीय महाकाव्यावर आधारित है. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ आहे. या फिल्ममध्ये श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतामाईच्या रोलमधअये साई पल्लवी आणि लक्ष्मण म्हणून रवी दुबे दिसणार आहे. तर रावण बनला आहे अभिनेता यश.. तसेच सनी देओल, रकुल प्रीत सिंह आणि लारा दत्ता यांसारेख ितरही मोठे कलाकार आहेत. ही फिल्म दोन भागांत रिलीज होणार असून पहिला भाग 5 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
