Aaradhya Bachchan : ऐश्वर्या रायपेक्षा उंच झाली आराध्या, अभिनेत्रीच्या लेकीला पाहून नेटकरी अवाक, म्हणतात…

Aishwarya Rai Daughter Aaradhya Bachchan : ऐश्वर्या रायची लेक आराध्या बच्चनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिची उंची वाढलेली दिसत आहे.

| Updated on: Oct 25, 2026 | 9:09 PM
1 / 5
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी, आराध्या बच्चन, पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. १४ वर्षीय आराध्याचे नवीन फोटो तिच्या बदललेल्या रूपासाठी आणि उंचीसाठी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी, आराध्या बच्चन, पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. १४ वर्षीय आराध्याचे नवीन फोटो तिच्या बदललेल्या रूपासाठी आणि उंचीसाठी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

2 / 5

फोटोंमध्ये, आराध्या तिची आई ऐश्वर्यापेक्षा उंच दिसत आहे. या फोटोंमध्ये, ऐश्वर्यानं तिचा भाऊ आदित्य राय, आई वृंदा राय आणि मुलगी आराध्या यांच्यासोबत भाचा शिवांशचा वाढदिवस साजरा केला.

3 / 5

या कौटुंबिक क्षणांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. आराध्या तिच्या आईपेक्षा उंच दिसतेय. एका चाहत्याने लिहिलं, 'ऐश्वर्याची मुलगी तिच्यापेक्षा उंच कशी काय दिसते?' दुसऱ्यानं लिहिलं, 'किती सुंदर कुटुंब आहे.'

4 / 5

आराध्या तिच्या बदललेल्या लूकमुळे चर्चेत राहिली आहे. विमानतळावरील तिचा स्पोर्टी लूक आणि लांब केसांनीही चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं.

5 / 5

या संपूर्ण लूकमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ऐश्वर्या आणि आराध्याने घातलेले सारखे कपडे. दोघींनीही वेगवेगळ्या शैलीत निळ्या रंगाची निवड केली होती, ज्यामुळे माय-लेकीची जोडी अधिकच आकर्षक दिसत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us