Aarti Solanki : आता देवींना लटकवू नका, त्याच अँगलवर स्वतःच्या घरच्यांना लटकवा; बॅलेंसिंग मूर्तीवर मराठी अभिनेत्रीचा संताप
Aarti Solanki : आरती सोलंकी सोशल मीडियावर सक्रिय असते. यापूर्वी अभिनेत्रीनं गणपतीच्या बॅलेंसिंग मूर्तीवर संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केलेली. आता आरतीनं देवीच्या बॅलेंसिंग मूर्तीवर संताप व्यक्त केलाय.

काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. बाप्पाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती पाहायला मिळाल्या. त्यात यावर्षी सर्वात चर्चित असलेला मूर्तीचा प्रकार म्हणजे बॅलेंसिंग मूर्ती‘ अनेक मंडळांनी बाप्पाची बॅलेंसिंग मूर्ती आणलेली. त्यामुळे ट्रोलिंगसुद्धा झालं. इतकंच नव्हे तर वेगेवेगळ्या अवतारातील बाप्पाची मूर्ती पाहायला मिळाली. यावरून भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. अशातच आता 11 ऑक्टोबर रोजी घटस्थापना असून देवींचं आगमन होताना दिसत आहे. देवींच्या मूर्तीची क्रेझही वाढली आहे. महत्वाचं म्हणजे, गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच देवीच्याही बॅलेंसिंग मूर्ती पाहायला मिळत आहेत. यावर आता मराठी अभिनेत्री आरती सोलंकीनं संताप व्यक्त केला असून प्रतिक्रिया दिली आहे.
आरती सोलंकीची पोस्ट
मराठी अभिनेत्री आरती सोलंकी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि सामाजिक विषयांवर तिचं मत व्यक्त करते. आता देवीच्या बॅलेंसिंग मूर्तीवर अभिनेत्रीनं संताप व्यक्त केलाय. सोशल मीडियावर पोस्ट करत आरतीनं लिहिलं की, ‘हिंदू म्हणून तीव्र निषेध, बॅलेंसिंगच्या नावाखाली गणपती बाप्पांना लटकवलं…आता देवींना लटकवू नका. एवढीच कला दाखवायची असेल तर त्याच अँगल वर स्वतःच्या घरातल्यांना लटकवा.’
‘आम्ही येऊ तुमचं कौतुक करायला नक्की….आपल्या हिंदू सणांची परंपरा, मर्यादा, शिस्त, लाज या गोष्टी जपा त्याचं हसं होऊ देऊ नका.’ असं आरतीनं शेवटी म्हटलं आहे.
यापूर्वी गणपती बाप्पाच्या बॅलेंसिंग मूर्तीबद्दल अभिनेत्रीनं लिहिलेलं की, ‘अरे हे काय चालवलंय? गणपती बाप्पाच रूप मुळातच सुरेख, देखणे, गोड असताना बाप्पा ला वेगळं रूपात घडवण्याची गरजच काय? मंडपात देखावा हवा तो करा. खरंतर त्याची ही गरज नाहीपण मंडळाच्या स्पर्धेत वाढ झाली काय करणार? सगळ्यात वाईट गोष्ट बॅलेंसिंगच्या नावावर अक्षरशः हा बाप्पाला हेवेत लटकवून ठेवणं हे योग्य आहे का? वाईट वाटतं बाप्पासाठी. आपला सण आणि बाप्पा हा पारंपारीक हवा. स्वतःच्या मुलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तयार करतात तसं बिचाऱ्या बाप्पाला सजावतायत. माफ करा बाप्पा तुम्ही बुद्धीचे देवता आहात…आता या सगळ्यांना चांगली बुद्धी द्या.’