Kubbra Sait : एखादी स्त्री अभिनेत्याच्या आसपास…गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, लोकप्रिय अभिनेत्रीचा संताप

Govinda Affair Rumors : गोविंदा आणि कोमल राणी यांच्या अफेअरच्या चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहेत. अशातच आता अभिनेतायच्या या अफेअरच्या चर्चांवर अभिनेत्री कुब्रा सैतनं संताप व्यक्त केला आहे.

Kubbra Sait : एखादी स्त्री अभिनेत्याच्या आसपास...गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, लोकप्रिय अभिनेत्रीचा संताप
| Updated on: Sep 30, 2026 | 4:24 PM

बॉलिवूड अभिनेता गोविंदाचं वैयक्तिक आयुष्य गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अभिनेत्री आणि सह-कलाकार कोमल राणी स्वर्णकरसोबतच्या त्याच्या अनेक सार्वजनिक उपस्थितीमुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या. गोविंदा आणि कोमल मुंबईच्या लालबागच्या राजा येथे एकत्र दिसले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. आता, अभिनेत्री कुब्रा सैत गोविंदाच्या बचावासाठी पुढे आली आहे.

कुब्रा सैत गोविंदाच्या समर्थनार्थ पुढे आली

Loading...

कुब्रा सैतनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तिनं गोविंदा आणि कोमल राणी यांच्याभोवती सुरू असलेल्या चर्चांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिनं प्रश्न विचारला की, लोक एखाद्या कलाकाराचे चाहते असण्यापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चौकशी करण्यापर्यंत कधी पोहोचले. गोविंदाबद्दल बोलताना कुब्रा म्हणाली की, ती त्याचे चित्रपट बघत मोठी झाली आणि तिच्यासाठी तो ९० च्या दशकातील एक मोठा सुपरस्टार, आयकॉन आणि लीजेंड होता. कुब्रा म्हणाली की, आजकाल एखादी स्त्री एखाद्या अभिनेत्याच्या आसपास किंवा त्याच्यासोबत दिसल्यास, तिला लगेचच ‘मिस्ट्री गर्ल‘ किंवा ‘कथित गर्लफ्रेंड‘ असं लेबल लावल जातं.

कुब्रा म्हणाली की, ती गोविंदाला वैयक्तिकरित्या ओळखत नाहीत, पण ती अभिनेच्याची पत्नी सुनीता अहुजाला भेटली आहे. कुब्रा म्हणाली की, सुनीता स्पष्टवक्ती आणि विनोदी आहे. पण, अफवा पसरल्यानंतर सुनीता किंवा इतर कोणत्याही स्त्रीने वारंवार स्पष्टीकरण द्यावे, या गोष्टीवर कुब्रानं आक्षेप घेतला.

पुढे कुब्रा म्हणाली की, सार्वजनिक जीवनातील लोकांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तिनं महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला आणि म्हटलं की, महिलांचा आदर केवळ एखाद्या मोठ्या किंवा गंभीर घटनेनंतर प्रतिक्रिया देण्यापुरता मर्यादित नसावा. महिलांच्या निवडी आणि वैयक्तिक निर्णयांचा दैनंदिन जीवनातही आदर केला पाहिजे. कोणत्याही महिलेला तिच्या आयुष्याबद्दल किंवा निर्णयांबद्दल वारंवार स्पष्टीकरण देण्यास भाग पाडू नये. शेवटी, कुब्राने लोकांना सल्ला दिला की, जर ते कोणाबद्दल काही सकारात्मक बोलू शकत नसतील, तर त्यांनी काहीही बोलू नये आणि एक चाहता म्हणून त्यांच्या कलेचा आनंद घ्यावा.

गोविंदानेही या अफवांवर स्पष्टीकरण दिले

गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर यांना विविध प्रसंगी एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा झाल्या. विमानतळावर आणि लालबागच्या राजा येथील त्यांच्या एकत्र दिसण्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली. दरम्यान, गोविंदानं या बातम्या फेटाळून लावल्या आणि सांगितलं की कोमलसोबतचं त्याचं नाते पूर्णपणे व्यावसायिक आहे. लालबागच्या राजाला भेट देण्यामागे त्याचा उद्देश त्याच्या ‘रूपा’ या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करणं हा होता. गोविंदानं असाही दावा केला की, या अफवा त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर करण्याचा आणि त्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us