सौरव गांगुलीसोबत अफेअर, तीन विवाहित पुरुषांसोबत जोडलं नाव; बॉलिवूडसह गाजवली इंडस्ट्री, वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री

Bollywood Actress : बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव सौरव गांगुलीसह तीन विवाहित अभिनेत्यांसोबत जोडलं गेलेलं. जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल.

| Updated on: Oct 02, 2026 | 9:05 PM
1 / 7
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अनेक वेळा लग्न केलं आहे आणि त्यांचे अफेअर्सही होते, ज्यामुळे ते चर्चेत राहिले. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिनं कधीही लग्न केलं नसलं तरी, तिचं नाव विवाहित पुरुषांशी जोडलं गेलं होतं. तिचं अंडरवर्ल्ड डॉनसोबत अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. एकदा तिच्या एका बॉयफ्रेंडनं तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे तिला इंडस्ट्री सोडावी लागली. चला तर मग जाणून घेऊया ती कोण आहे.

2 / 7

या अभिनेत्रीचं नाव नगमा आहे. नगमाची आई मुस्लिम आणि वडील हिंदू होते. पण, अभिनेत्रीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

3 / 7

नगमाचे नाव तीन अभिनेते आणि एका क्रिकेटपटूसोबत जोडलं गेलं होतं. तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अनीस इब्राहिमसोबतही जोडलं गेलं होतं. अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आणि ही एक अफवा असल्याचं सांगून ते पूर्णपणे नाकारलं.

4 / 7

नगमाचे नाव क्रिकेटपटू सौरव गांगुलीसोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्या नात्याची बातमी २००१ मध्ये समोर आली, त्यावेळी सौरव विवाहित होता. त्यांच्या नात्याच्या अफवा इतक्या जोर धरू लागल्या की, त्यानंतर लगेचच दोघांनी आंध्र प्रदेशातील एका मंदिरात गुपचूप लग्न केल्याची चर्चा सुरू झाली. पण, यात काहीही तथ्य नाही. त्यांच्या ब्रेकअपच्या कारणाबद्दल बोलायचं झाल्यास, क्रिकेटपटूच्या सततच्या खराब कामगिरीसाठी अभिनेत्रीला जबाबदार धरण्यात आलं. त्यामुळे त्यांनी परस्पर संमतीनं आपलं नातं संपवलं.

5 / 7

सौरव गांगुलीसोबतच्या ब्रेकअपनंतर, सार्वजनिक दबावामुळे वेगळं होण्यास भाग पडल्यानं नगमा खूप खचली होती. त्यानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळली आणि तिथं तिनं आपलं करिअर सुरू केलं. तिथं ती अभिनेता-खासदार शरत कुमारच्या प्रेमात पडली. वृत्तानुसार, तो विवाहित असल्यामुळे त्यांनी आपलं प्रेमप्रकरण लपवून ठेवलं होतं. मात्र, जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्याच्या पत्नीला कळले, तेव्हा त्यांनी संबंध तोडले आणि घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर शरतनं नगमासोबतचं नातं तोडलं.

6 / 7

त्यानंतर नगमा भोजपुरी इंडस्ट्रीत गेली. तिचं नाव रवी किशनसोबत जोडलं गेलं. अभिनेता विवाहित असूनही ते दोघं एकमेकांना डेट करत होते. पण, कालांतरानं नगमानं या अफवा म्हणत चर्चा फेटाळून लावल्या.

7 / 7

नगमाचं नाव मनोज तिवारीसोबतही जोडलं गेलं होतं. मात्र, अभिनेत्रीनं म्हटलेलं की, 'मी त्याच्यासोबत काम करते याचा अर्थ असा नाही की आमच्यात काहीतरी सुरू आहे. कृपया मला एकटं सोडा! रवी आणि मनोज दोघेही विवाहित आहेत.'

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us