मुलगी राशा प्रेमात पडलेली नाही आवडणार, रवीना टंडनचे मोठे विधान, म्हणाली, मी माझ्या आयुष्यात केलेल्या चुका..

| Updated on: Apr 24, 2024 | 7:12 PM

Raveena Tandon : बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रवीना टंडन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. रवीना टंडन हिची मुलगी राशा ही देखील लवकरच चित्रपटांमध्ये धमाका करताना दिसणार आहे. आता नुकताच मुलगी राशा हिच्याबद्दल रवीनाने मोठे विधान केले आहे.

मुलगी राशा प्रेमात पडलेली नाही आवडणार, रवीना टंडनचे मोठे विधान, म्हणाली, मी माझ्या आयुष्यात केलेल्या चुका..
Raveena Tandon and Rasha Thadani
Follow us on

बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रवीना टंडन हिची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता आई रवीना टंडननंतर लेक राशा थडानी ही बाॅलिवूडमध्ये धमाका करण्यास तयार आहे. राशा थडानी ही लवकरच चित्रपटात काम करताना दिसणार आहे. राशा थडानी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच आता रवीना टंडनने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना रवीना दिसलीये.

रवीना टंडन म्हणाली की, मला कधीच वाटणार नाही की माझ्या लेकीने प्रेमात पडावे. कारण या वयात अभ्यास आणि करिअर अत्यंत महत्वाचे आहे. त्यावर फोकस करणे आवश्यक आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे की, तिने सध्या तिच्या करिअरवर लक्ष द्यावे. आपल्या लाईफबद्दल अधिक प्रॅक्टिकल असणे आवश्यक असल्याचेही रवीना टंडनने म्हटले.

एखाद्या व्यक्तीला पार्टनर म्हणून निवडण्यासाठी आपल्याला अनेक लोकांना भेटावे लागते. त्यावेळीच तुम्ही योग्य व्यक्तीला निवडू शकता. परंतू कोणत्याही नात्यामध्ये एकदम घाईमध्ये निर्णय घेणे अजिबातच योग्य नाही. यामुळेच मी माझ्या मुलीला देखील हेच सांगतले की, तुमचा वेळ घ्या, घाई करण्याची काही गरज नाही. मुलींना लग्न करणे मजाक वाटतो.

मेहंदी लावून, खास कपडे घालून लग्न करणे इतके सोपे नाहीये. लग्न काही मजाक नाहीये. त्यामुळे व्यवस्थित विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. कारण एखाद्या व्यक्तीसोबत तुम्हाला आयुष्य काढायचे आहे. पुढे रवीना म्हणाली की, मला नाही वाटत की, तिने माझ्या चुकांमधून काही शिकावे. मी तर नेहमीच तिच्यासोबत राहणार नाही ना..

आता रवीना टंडन हिने केलेल्या या विधानांची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर रवीना टंडन हिने स्पष्ट केले की, राशाने आता प्रेमात वगैरे न पडता अगोदर आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे. रवीना टंडन हिने बाॅलिवूडला अनेक हिट चित्रपट दिली आहेत. आता तशीच अपेक्षा ही राशा हिच्याकडून चाहत्यांना नक्कीच आहे. राशा थडानी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.