Sara Ali Khan-Sharmila Tagore : आजी शर्मिला टागोरसह साराने केला क्युट डान्स, व्हिडीओवर नेटीजन्स फिदा

| Updated on: Jun 03, 2023 | 7:04 PM

'जरा हटके जरा बचके' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणाऱ्या सारा अली खानने एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती तिची आजी, अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबत दिसत आहे.

Sara Ali Khan-Sharmila Tagore : आजी शर्मिला टागोरसह साराने केला क्युट डान्स, व्हिडीओवर नेटीजन्स फिदा
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह असते. ती कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असेल तरी ती त्याचे अपडेट्स चाहत्यांना देते. नुकताच तिचा विकी कौशलसोबतचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. दोघांनीही त्याचे जोरदार प्रमोशन केले आहे. यासोबतच त्यांनी अनेक फनी रील्सही पोस्ट केले होते. आता सारा अली खानने तिची आजी शर्मिला टागोर यांच्यासोबतचा (Sharmila Tagore) एक क्युट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्या दोघीही एका जुन्या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहेत.

सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची आजी, शर्मिला टागोर याही दिसत आहेत. दोघेही सेटवर एकत्र एन्जॉय करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सारा अली खानने शर्मिला टागोर यांचा हात धरलेला दिसत आहे आणि त्या दोघी एका बाजूला चंद्राकडे तर दुसरीकडे सूर्याच्या किरणांकडे बोट दाखवत आहेत. बॅकग्राउंडमध्ये लता मंगेशकर यांचे ‘चंदा है तू मेरा सूरज है तू’ हे गाणे वाजते आहे. सारा आजीच्या खांद्यावर डोके ठेवून आराम करताना दिसली.

सारासोबतच शर्मिला टागोरही स्टायलिश दिसत होत्या. व्हिडिओ शेअर करताना साराने लिहिले की, ‘स्पेशल डे’. साराची आत्या सबा पतौडी यांनी या पोस्टवर रेड हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. ही पोस्ट चाहत्यांनाही खूप आवडली असून एका चाहत्याने लिहिले, ‘हे खूप क्यूट आहे!’ तर दुसऱ्याने कमेंट केली, “हा व्हिडिओ किती क्यूट आहे.”

 

बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसल्या शर्मिला टागोर

शर्मिला टागोर या काही दिवसांपूर्वी मनोज बाजपेयी, सिमरन, सूरज शर्मा आणि अमोल पालेकर यांच्यासोबत ‘गुलमोहर’मध्ये दिसल्या होत्या. 13 वर्षांनंतर त्यांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले.

दरम्यान, सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट 2 जून रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. ती पुढे ‘ए वतन मेरे वतन’, ‘मेट्रो इन दिनों’ आणि ‘मर्डर मुबारक’मध्ये दिसणार आहे.