सात दिवसांत अक्षय कुमारचा ‘केसरी’ 100 कोटी क्लबमध्ये

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याचा ‘केसरी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 21 शूर शिखांच्या शौर्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. तर प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी या सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्येही एन्ट्री घेतली. त्यासोबतच ‘केसरी’ने अभिनेता रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉय’ आणि अभिनेता अजय देवगणच्या ‘टोटल […]

सात दिवसांत अक्षय कुमारचा ‘केसरी’ 100 कोटी क्लबमध्ये
Follow us on

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याचा ‘केसरी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 21 शूर शिखांच्या शौर्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. तर प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी या सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्येही एन्ट्री घेतली. त्यासोबतच ‘केसरी’ने अभिनेता रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉय’ आणि अभिनेता अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’ या सिनेमांनाही मागे सोडलं आहे.

सिनेसमीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. ‘केसरी’ने पहनिल्याच दिवशी 21.06 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 16.70 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी शनिवारी 18.75 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी रविवारी 21.51 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर सोमवारी सिनेमाने 8.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तर मंगळवारी 7.17 कोटी रुपये कमवले. बुधवारी सातव्या दिवशी या सिनेमाने 6.52 कोटी रुपयांची कमाई केली. यासोबतच अवघ्या सात दिवसांत या सिनेमाने 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेतली. सिनेमाने आतापर्यंत 100.01 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

ज्याप्रकारे या सिनेमाची सुरुवात झाली होती, त्यावरुन पाच दिवसातच हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करेल, अशी शक्यता होती. मात्र, आयपीएल सुरु झाल्यानंतर या सिनेमाच्या कलेक्शनवर त्याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे आयपीएल दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या इतर सिनेमांवरही याचा परिणाम होऊ शकतो. या आठवड्यात प्रदर्शित होणारे ‘नोटबुक’ ‘गॉन कॅश’ आणि ‘जंगली’ या सिनेमांना आयपीएलमुळे मोठे नुकसान होऊ शकते. मात्र, अक्षय कुमारचा चाहतावर्ग बघता त्याचा ‘केसरी’ आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे.

21 शिखांच्या शूरतेची कहाणी ‘केसरी’

122 वर्षांपूर्वी म्हणजेच 1897 मध्ये 21 शिखांनी 10 हजार अफगाणी हल्लेखोरांशी लढाई केली होती. सारागढी येथे 12 सप्टेंबर 1897 ला ही लढाई लढली गेली. ‘केसरी’ हा सिनेमा याच लढाईवर आधारित आहे.

VIDEO :