Amitabh Bachchan : रोहित शर्मा खेळत असताना मी त्याला सोडून त्याच्या बायकोला पाहतो…अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य

Amitabh Bachchan On Rohit Sharma Wife : अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती १८' या शोमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिकाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Amitabh Bachchan : रोहित शर्मा खेळत असताना मी त्याला सोडून त्याच्या बायकोला पाहतो...अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Sep 29, 2026 | 5:03 PM

अमिताभ बच्चन अनेकदा ‘कौन बनेगा करोडपती १८’ या शोमध्ये रंजक खुलासे करतात. नुकत्याच एका एपिसोडमध्ये एक स्पर्धक क्रिकेटपटू रोहित शर्माचा चाहता असल्याचं समोर आलं. यादरम्यान, बिग बींनी खुलासा केला की त्यांनाही रोहित शर्मा खूप आवडतो. खरं तर, जेव्हा जेव्हा सामना सुरू असतो, तेव्हा ते क्रिकेटपटूची पत्नी रितिका सजदेहकडे बघत असतात. अमिताभ यांनी सांगितलं की, सामन्यांदरम्यान त्यांचे डोळे अनेकदा रितिकाला शोधत असतात आणि यामागे एक विशिष्ट कारण आहे.

शोमध्ये आलेल्या सोनाली नावाच्या एका स्पर्धकाने खुलासा केला की, ती रोहितची खूप मोठी चाहती आहे. तिनं गंमतीनं असंही म्हटलं की, ती स्वतःला रोहितची पत्नी मानते. यावर अमिताभ बच्चन यांनी विनोदी पद्धतीनं उत्तर दिलं. यानंतर, बिग बींनी रितिकाशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला.

Loading...

शोमधील क्रिकेटशी संबंधित एका प्रश्नादरम्यान, अमिताभ बच्चन यांनी सोनालीला क्रिकेटबद्दल विचारलं. सोनालीनं तिला रोहित शर्मा आवडत असल्याचं सांगितलं. सोनाली म्हणाली, ‘सर, मी रोहितची खूप मोठी चाहती आहे आणि त्याला खेळताना पाहणं हे माझं सर्वात मोठं स्वप्न आहे. मी स्वतःला त्याची पत्नी मानते.’ हे ऐकून अमिताभ बच्चन म्हणाले, ‘तू त्याची पत्नी होण्यासाठी इथे आली आहेस, हे मी त्याला सांगेन.’

सोनालीच्या वक्तव्यानंतर, बिग बी म्हणाले की, त्यांना रोहित खूप आवडतो आणि त्यांनी त्याच्याशी अनेक वेळा वैयक्तिकरित्या संवाद साधला आहे. अमिताभ म्हणाले, ‘पण माझा आवडता आहे आणि तो मला खूप आवडतो आणि मी त्याच्याशी अनेक वेळा वैयक्तिकरित्या बोललो आहे.’

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, जेव्हा रोहित शर्मा खेळत असतो, तेव्हा रितिका नेहमी प्रार्थना करत असते. ते म्हणाले, ‘जेव्हा तो खेळतो, तेव्हा मी त्याला पाहतो. पण स्टेडियममध्ये मी त्याच्या पत्नीकडे पाहतो. कारण, रोहित जेव्हा खेळत असतो तेव्हा त्याची पत्नी रितिका स्टेडियममध्ये फिंगर क्रॉस करून बसलेली असतेयाबाबत मला खूप उत्सुकता होती म्हणून मी रोहितला त्याबद्दल विचारलं होतं. त्याने सांगितलं होतं की त्यांचं लग्न व्हायच्या आधीपासून ती असं करते.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us