Amitabh Bachchan : काही दिवस आराम करायला सांगितलाय…अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

Amitabh Bachchan Post : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली असून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Amitabh Bachchan : काही दिवस आराम करायला सांगितलाय...अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
| Updated on: Oct 21, 2026 | 7:19 PM

रविवारी रात्री अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला असून सात गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारातून अभिनेता थोडक्यात बचावला. टायगरवर गोळीबार करणारे हल्लेखोर सुमारे महिनाभरापूर्वी मुंबईत आले होते. ते ए-लिस्ट कलाकारांच्या घरांची पाहणी करत होते. त्यांनी एक ऑटोरिक्षा भाड्यानं घेतली आणि त्यातून मुंबईचा दौरा केला. पाहणी करण्यासाठी ते बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी गेले. ऑटोरिक्षा चालकानं या लोकांना अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यासह विविध सेलिब्रिटींच्या घरी नेलं. आता, टायगरवरील हल्ल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट केली आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट

Loading...

मेगास्टार अमिताभ बच्चन नेहमीच चर्चेत असतात. ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात आणि पोस्ट शेअर करतात. मात्र, बुधवारी अमिताभ यांनी पोस्ट करत म्हटलं की, ते सोशल मीडियावर काहीही पोस्ट करू शकत नाहीत.

अमिताभ बच्चन यांनी एका पोस्टमध्ये लिहिलं की, ‘मी माफी मागतो. मला विश्रांती घेण्यासाठी आणि ताजंतवानं होण्यासाठी काही दिवस आराम करायला सांगितलं आहे. त्यामुळे मी काहीही लिहू शकत नाही.’ अमिताभ यांच्या पोस्टनंतर चाहते चिंतेत पडले आहेत आणि त्यांना काय झालं आहे, असं विचारत आहेत. चाहते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या तब्येतीबद्दल आणि त्यांची प्रकृती ठीक आहे का? असं विचारत आहेत.

अमिताभ बच्चन यांचा आगामी सिनेमा

दरम्यान, अमिताभ बच्चन शेवटचे ‘वेट्टैयन’ या तमिळ चित्रपटात दिसले होते. ते ‘द रिअल सुपरस्टार’ या माहितीपटातही दिसले होते. २०२५ मध्ये बिग बींनी ‘१२० बहादूर’ या सिनेमासाठी व्हॉईसओव्हर दिला होता. अमिताभ बच्चन आता ‘कल्की २८९८ एडी: पार्ट २’ या चित्रपटात दिसणार आहेत. यात ते ‘अश्वत्थामा’ची भूमिका साकारणार असून अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाच्या पहिल्या भागातही काम केलं होतं आणि या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या भागात प्रभास आणि दीपिका पादुकोण यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us