Amitabh Bachchan : आमचे विचार वेगळे…अभिषेकबद्दल अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य

Amitabh Bachchan On Abhishek Bachchan : अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनबद्दल भाष्य केलं असून त्यांच्यातील नातं कसं आहे, याबद्दल सांगितलं आहे.

Amitabh Bachchan : आमचे विचार वेगळे...अभिषेकबद्दल अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Sep 30, 2026 | 3:33 PM

अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यातील नाते नेहमीच खास राहिलं आहे. ते एकमेकांची उघडपणे प्रशंसा करतात. अमिताभ यांनी अनेकदा सांगितलं आहे की, त्यांना अभिषेकच्या चित्रपटांचा आणि त्याच्या मेहनतीचा अभिमान आहे. अभिषेकसुद्धा आपल्या वडिलांना आपला हिरो मानतो. आता, अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा आपला मुलगा अभिषेक बच्चनसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. एका ब्लॉगमध्ये त्यांनी सांगितलं की, बदलत्या पिढ्यांनुसार वडील आणि मुलाचे दृष्टिकोन जरी वेगळे असले, तरी त्यांचं ध्येयं एकच आहे. आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी नव्या पिढीच्या मतांचा आदर करण्याबद्दलही सांगितलं आहे.

काय म्हणाले अमिताभ बच्चन?

Loading...

बिग बींनी लिहिलं की, ‘वडील आणि मुलानं एकत्र, एकाच मंचावर राहावं, आमचे विचार वेगळे असले तरी, अंतिम ध्येय एकच आहे.’ पुढे नवीन पिढीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी लिहिलं की, ‘पुढच्या पिढीबद्दल नेहमीच आदर असायला हवा. पण ध्येय नेहमी तेच राहिलं पाहिजे. हेच प्रत्येक नात्याचं आदर्श असलं पाहिजे.’ पुढे अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या कवितेतील एक ओळही लिहिली असून त्या ओळीचा अर्थ असा आहे की, एकच मार्ग धर आणि चालत राहा, तू अखेरीस तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचशील.

‘आमचं नातं नेहमीच असं राहिलं आहे – शोध घेणं, समजून घेणं आणि मग सर्वांसाठी चांगला मार्ग तयार करणं.’

यापूर्वीही बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये अभिषेक बच्चनबद्दल सांगितलं आहे. त्यांनी एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की, ते कशाबद्दल तरी काळजीत होते, त्यांना अस्वस्थ वाटत होतं. तेव्हा, कोणतीही पूर्वसूचना न देता, अभिषेक अचानक त्यांच्या खोलीत आला. आपल्या मुलाला समोर पाहताच त्यांची सगळी नकारात्मकता, चिंता आणि काळजी नाहीशी झाली. याबद्दल अमिताभ बच्चन म्हणाले, ‘जेव्हा मी गोंधळलेला आणि अस्वस्थ होतो, तेव्हा माझा मुलगा कोणतीही पूर्वसूचना न देता खोलीत आला. त्याच्या अचानक येण्याने माझ्या सर्व चिंता एका क्षणात संपल्या. तो केवळ एक मुलगा नाही. तो एक चांगला जोडीदार, एक मित्र आणि त्याहूनही खूप काही आहे.’

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी १९७३ मध्ये जया बच्चन यांच्याशी लग्न केलं. त्यांना श्वेता आणि अभिषेक ही दोन मुलं आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us