Anita Kanwal : मी आणखी 10-12 वर्षे जगले तर…वयाच्या 72 व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर ओढावलंय आर्थिक संकट, कामासाठी करतेय वणवण

Anita Kanwal : सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता कंवल यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांची आर्थिक अडचण सांगितली आहे.

Anita Kanwal : मी आणखी 10-12 वर्षे जगले तर...वयाच्या 72 व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर ओढावलंय आर्थिक संकट, कामासाठी करतेय वणवण
| Updated on: Oct 19, 2026 | 7:18 PM

ज्येष्ठ अभिनेत्री अनिता कंवल यांनी नुकतंच काम मिळवण्यासाठीचा आपला संघर्ष आणि त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटांबद्दल सांगितलं. एका मुलाखतीत अनिता यांनी सांगितले की, त्यांची सेव्हिंग एका वर्षात संपू शकते आणि आता काम मिळणं खूप आवश्यम आहे. इंडस्ट्रीतील अनेक लोकांशी संपर्क साधूनही अभिनेत्रीला अद्याप कोणतंही काम मिळालेलं नाही. ‘बनेगी अपनी बात’, ‘शांती’ आणि ‘ससुराल गेंदा फूल’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनिता कंवल यांनी सध्या त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘मला पैसे कमवायचे आहेत. जर मी आणखी १०-१२ वर्षे जगले, तर मी काय करेन? माझं घर हीच माझी एकमेव मालमत्ता आहे. माझी बचत एका वर्षात संपून जाईल, त्यामुळे मला कामाची गरज आहे.’

अनिता यांनी सांगितली आपबिती

Loading...

‘माझ्या मुलांना मला मदत करायची असली तरी, मला त्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत. मला अशा स्थितीत राहायचं आहे, जिथे मी इतरांना काहीतरी परत देऊ शकेन. आजच्या नवीन कलाकारांना मी पूर्वी काय केलं आहे, हे माहीतसुद्धा नाही. माझ्या काळात, मला एका २१ वर्षांच्या मुलीची भूमिका देऊ केली होती. मी कामासाठी भीक मागत नाही. अनिता कंवाल कोण आहे आणि तिनं काय केलं आहे हे जर कोणालाच माहीत नसेल, तर मी काहीही करू शकत नाही. मी ऑडिशन्सला जाते, कास्टिंग डायरेक्टर्सना भेटते, पण मला कुठेच काम मिळत नाहीये.’

मुलाखतीदरम्यान, अनिता कंवाल यांनी ‘कभी हाँ कभी ना’ मध्ये शाहरुख खानसोबत काम करण्याचा आपला अनुभवही सांगितला. या चित्रपटात दीपक तिजोरी यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अनिता कंवाल यांनी खुलासा केला की, त्यांचे काही सीन्स चित्रपटातून काढण्यात आले होते. ‘मी ‘कभी हाँ कभी ना’ साठी कधीच ऑडिशन दिलं नाही. त्या चित्रपटात काम करताना मला खूप मजा आली. त्यावेळी मी इंडस्ट्रीत पूर्णपणे नवीन होते. शाहरुख खान मला माझ्या दिल्लीतल्या दिवसांपासून ओळखत होता. तो एक उत्तम अनुभव होता. त्यावेळी, दीपक तिजोरीच्या आईची भूमिका साकारण्यासाठी मी खूप लहान आहे, असं सर्वांना वाटत होतं. मी ३५-३६ वर्षांची होते, पण ती एक चांगली भूमिका होती. चित्रपटात माझी भूमिका त्याहूनही मोठी होती, पण एडिटिंग करताना काही भाग कापण्यात आले. ‘दीवाना’ खूप हिट ठरला, त्यामुळे शाहरुखचा मोटरसायकल सीन वाढवण्यात आला. यामुळे आमचे सीन लहान झाले, पण तरीही लोकांनी माझ्याकडे लक्ष दिलं आणि त्यानंतर मी टीव्हीवर मोठ्या प्रमाणावर काम केलं.’

२००३ सालच्या ‘गंगाजल’ चित्रपटात प्रकाश झा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना अनिता कंवाल म्हणाल्या की, चित्रपटाच्या यशानंतर त्यांचं मानधन दुप्पट झालं होतं. त्या म्हणाल्या, ‘प्रकाश झा यांच्यासोबत काम करणं खूप छान होतं. प्रकाशजींबद्दल एक गोष्ट आहे जी मी कधीच विसरणार नाही. जेव्हा मी ‘गंगाजल’वर काम करत होते, तेव्हा मला वेळेवर पूर्ण पैसे मिळायचे. एके दिवशी, त्यांच्या ऑफिसमधून मला फोन आला की माझा चेक तयार आहे, म्हणून मी म्हणालो की मला माझे पूर्ण पैसे आधीच मिळाले आहेत. मला सांगण्यात आलं की ‘गंगाजल’ खूप यशस्वी झाल्यामुळे प्रकाशजींनी प्रत्येकाला एक अतिरिक्त चेक दिला होता. ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. असं कोण करतं? इथे, जर लोकांनी तुम्हाला पूर्ण पैसे दिले, तर ती एक मोठी गोष्ट असते.’ विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत अनिता बोलत होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us