Anupam Kher: आईवर जीव ओवळून टाकणाऱ्या आईच्या लेकावर अनुपम खेर झाले फिदा; म्हणाले मला त्याचा पत्ता द्या…

| Updated on: Jul 04, 2022 | 11:09 PM

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की ही व्यक्ती एक किंवा दोन वर्षांपासून नाही, तर तब्ब्ल 20 वर्षांपासून आपल्या आईला कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवतो आहे. 80 वर्षांच्या आपल्या आईची इच्छा पूर्ण करताना कैलासने आईला देशभरातल्या अनेक तीर्थस्थळांचे दर्शन घडवले आहे.

Anupam Kher: आईवर जीव ओवळून टाकणाऱ्या आईच्या लेकावर अनुपम खेर झाले फिदा; म्हणाले मला त्याचा पत्ता द्या...
Follow us on

मुंबईः सोशल मीडियावर (Social Media) कायम सक्रिय राहत चाहत्यांशी घट्ट नाते जपणारे अनुपम खेर (Anupam Kher) एक अशी व्यक्ती आहे, जी केवळ रील लाइफच नाही तर रियल लाइफमध्येही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. त्यांचा अभिनयच नाही, तर त्यांचा सच्चेपणा ही एक गोष्ट आहे, जी चाहत्यांच्या मनावर मोठी छाप पाडून जाते. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांना आला आहे. स्वदेशी बहुभाषिक मायक्रो ब्लॉगिंग मंच ‘कू’वर (Koo App)अनुपम खेर यांनी एक अशी पोस्ट शेयर केली आहे, जी वाचून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभा राहत आहेत.

पोस्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, “या छायाचित्रात दिलेलं वर्णन अनोखं आहे. प्रार्थना करा की हे सत्य असावं. कुणाला या माणसाचा ठावठिकाणा माहीत झाला तर आम्हाला सांगा. @anupamcares त्यांना त्यांच्या आईसह जिथे कुठे तीर्थ यात्रांना जायचं आहे, त्या सगळ्या यात्रा स्पॉन्सर करेल. यातून आमचा मोठाच सन्मान होईल.”

 

असं आहे तरी काय या छायाचित्रात?

अनुपम खेर यांनी नुकतीच आपल्या कू हॅंडलवरून एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये एक व्यक्ती आपल्या आईला खांद्यावरच्या कावडीतून घेऊन चालत निघाला आहे. कैलाश गिरी ब्रह्मचारी नावाची ही व्यक्ती आजच्या कलियुगातला श्रावणबाळ म्हणून जनमाणसात प्रसिद्ध झाला आहे. आपल्या दृष्टीहीन आईविषयीचं त्याचं अथांग प्रेम, आदर या दृश्यातून झळकतो आहे.

आईला कावडीत बसवून तीर्थयात्रा

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की ही व्यक्ती एक किंवा दोन वर्षांपासून नाही, तर तब्ब्ल 20 वर्षांपासून आपल्या आईला कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवतो आहे. 80 वर्षांच्या आपल्या आईची इच्छा पूर्ण करताना कैलासने आईला देशभरातल्या अनेक तीर्थस्थळांचे दर्शन घडवले आहे.

मला माहिती कळवा

अनुपम यांनी ही पोस्ट शेयर केली आहे कारण त्यांना या व्यक्तीला मदत करायची आहे. यूजर्ससोबत ही पोस्ट शेयर करत अनुपमजींनी आवाहन केले आहे, की हा माणूस ज्या कुणाच्या संपर्कात आला असेल, कुठे राहतो हे माहित असेल, तर नक्की कळवा. मला याचं ओझं थोडंसं हलकं करायचं आहे.

सर्व तीर्थ यात्रा स्वत: स्पॉन्सर करणार

अनुपमज खेर यांची इच्छा आहे, की कैलास यांच्या येणाऱ्या सर्व तीर्थ यात्रा स्वत: स्पॉन्सर कराव्या. अनुपम यांच्या कमालीच्या उदार मनाचं दर्शन या वक्तव्यातून घडतं. सोबतच, कलियुगात आपल्या आईसाठी जीवन समर्पित करणाऱ्या या श्रावणबाळाने, अर्थात कैलाश गिरी ब्रह्मचारीने अवघ्या जगासाठी एक आदर्श घालून दिला आहे.