Nana Patekar : नाटकाच्या प्रयोगादरम्यान मी अशोकचे पाय दाबायचो, त्याबदल्यात तो मला…नाना पाटेकरांनी सांगितलेला किस्सा

एका नाटकाच्या दरम्यान नाना पाटेकर आणि अशोक सराफ यांची भेट झाली. ती भेटीचं रुपांतर घनिष्ठ मैत्रीत झालं. नाना पाटेकरांच्या पडत्या काळात अशोक सराफ यांनी त्यांना खूप मदत केली. त्याबदल्यात नाना अशोक सराफांचे हात- पाय दाबून द्यायचे. एका भाषणादरम्यान नानांनी हा किस्सा सांगितला होता.

Nana Patekar :  नाटकाच्या प्रयोगादरम्यान मी अशोकचे पाय दाबायचो, त्याबदल्यात तो मला...नाना पाटेकरांनी सांगितलेला किस्सा
nana patekar and ashok saraf
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2026 | 7:29 PM

नाना पाटेकर म्हणजे मैत्रीच्या दुनियेतला बाप माणूस ज्या प्रमाणे ते उत्तम कलाकार होते. त्याप्रमाणेच ते जीवाला जीव देणारे मित्रही होते. श्रद्धांजली सभेत अनेकांनी नानांनी आपल्याला केलेल्या मदतीचा उल्लेख केला. अनेक चांगल्या वाईट आठवणींना उजाळा दिला. पण नानांच्या पडत्या काळात अशोक सराफांनी त्यांना मदत केली होती. त्याबदल्यात नाना त्यांचे हात पाय चेपून द्यायचे.

प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन करून प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या अशोक सराफ यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. अशोक सराफाच्या काळात नानांनी रंगभूमीवर आपले पदार्पण केले होते. त्यामुळे नाना आणि अशोक सराफ यांची मैत्री फार जुनी आहे. अशोक सराफ यांनी नानांच्या कठीण काळात मदत केली. हाच प्रसंग कागल येथे झालेल्या एका भाषणात नाना पाटेकर यांनी सांगितला होता.

Loading...

नाना पाटेकर भाषणात म्हणाले की ” अशोकने मला वारंवार पैशाची मदत केली. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित हमीदाबाईची कोठी हे नाटक 1984 साली 40 वर्षापूर्वीपडद्यावर आले. त्यात मी नीना कुलकर्णी, अशोक सराफ, संजय नार्वेकर,स्मिता तांबे, मनवा नाईक, जितेंद्र जोशी असे कलाकार होतो. दोघांच्या घनिष्ठ मैत्रीची सुरूवात याच नाटकाच्या दरम्यान झाली. हमीदाबाईची कोठी नावाचं नाटक करत असताना मला 50 रूपये मिळायचे आणि अशोकला 250 रूपये मिळायचे. त्यावेळी ते 50 रूपये न परवडणारे होते आणि आर्थिक संकट वाढतचं जात होते. मधल्या वेळेत नाटक नसताना आम्ही पत्त्याने खेळायचो. तेव्हा अशोक मुद्दाम 5 – 10 रूपये माझ्यासोबत हरायचा. असे नाना पाटेकर म्हणाले. अशोक मुद्दाम पत्यामध्ये हरायचा हे मला माहित आहे. मलाही पैशाची गरज असल्याने मीही ते पैसे घ्यायचो. असं नानांनी सांगितलं.

नाटकांच्या प्रयोगादरम्यान किंवा दौऱ्यावेळी मी अशोकचे पाय दाबायचो असेही नाना म्हणाले, कधी हाताला तेल लाव, कधी पाय दाब अशी काम मी करायचो त्यामुळे तो आम्हाला त्याचे 5 रूपये द्यायचा असे नानांनी त्या कागल इथे झालेल्या भाषणात बोलले होते. आम्ही आजही कुठे भेटलो तरी मी त्याचे पाय दाबतो. कारण त्यानेच त्यावेळी मला संकटातून बाहेर काढले होते आणि त्याचे हे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. असे नाना

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us