Atul Parchure : …अशा लोकांमुळे माझं आयुष्य वाढलं, अतुल परचुरेंनी केलेलं नाना पाटेकरांचं कौतुक, सांगितलेला किस्सा

Atul Parchure On Nana Patekar : अतुल परचुरे यांनी एका जुन्या मुलाखतीत नाना पाटेकर यांचं कौतुक केलेलं. तसेच एक किस्साही सांगितला होता.

Atul Parchure : ...अशा लोकांमुळे माझं आयुष्य वाढलं, अतुल परचुरेंनी केलेलं नाना पाटेकरांचं कौतुक, सांगितलेला किस्सा
| Updated on: Oct 12, 2026 | 10:07 PM

नाना पाटेकर यांनी मराठीसह हिंदी इंडस्ट्रीही गाजवली. नाना पाटेकर यांचे इंडस्ट्रीत अनेक मित्र होते. त्यापैकी एक म्हणजे अतुल परचुरे. अतुल परचुरे यांचं 14 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 57व्या वर्षी निधन झालं. अतुल परचुरे यांना कॅन्सर झालेला. कालांतरानं त्यांची प्रकृती सुधारलेली. पण, नंतर पुन्हा हा आजार उफाळला आणि अतुल यांचं निधन झालं. दरम्यान, प्रकृती सुधारलेली असताना अतुल परचुरे यांनी एका पॉडकास्टला मुलाखत दिलेली. यादरम्यान, त्यांनी नाना पाटेकर यांचं कौतुक केलेलं.

काय म्हणालेले अतुल परचुरे?

Loading...

आजारपणाच्या काळात अनेक मित्रांनी अतुल यांची काळजी घेतली. त्यातलेच एक होते ते म्हणजे नाना पाटेकर. अतुल परचुरे म्हणालेले की, ‘नाना पाटेकर यांचा सोनियाचा फोन आलेला. काही लागेल ते सांगायचं, कधीही-कितीही काहीही. सोनिया म्हणाली की, ‘लागलं तर सांगू, पण आता ठीक आहे सगळं’ तर त्यांना एक काहीतरी अतुलसाठी करायचं. म्हणून, त्यांनी काय करावं? त्यांनी आयपीएलच्या दरम्यान मला फोन केला, मी तुला घ्यायला येतोय, आपण सुनील गावस्कर इनक्लूजियरमध्ये जाऊन मॅच बघायची. तुला क्रिकेट आवडतं ना? वानखेडे स्टेडीयममध्ये गावास्कारांची जी बॉक्स आहे, तिथे बसून त्यानं मला मॅच दाखवली. गावस्करांना दोन-तीन वेळेला भेटलो होतो. त्यांनी ओळख करून दिली, बरं नाहीये म्हणून म्हणाले, तुझ्या स्टॅन्डला मी त्याला घेऊन आलो. मॅच बघितली, परत घरी आणून सोडलं.’

‘तो अनिल कुंबळेचा खूप जवळचा मित्र आहे. अनिल कुंबळे आणि तो भेटणार होते. नानाने मला फोन केला, येतोस का जेवायला अनिल कुंबळे बरोबर? आम्ही लँड्स एन्डला त्याच्यासोबत जाऊन जेवलो. असे लोक होते! ज्यानं माझं आयुष्य वाढलं.’ असं अतुल परचुरे शेवटी म्हणाले. ‘मित्र म्हणे‘ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अतुल परचुरे बोलत होते.

दरम्यान, नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नाना पाटेकर यांच्या निधनानं कलाविश्वाला धक्का बसला असून एक पोकळी निर्माण झाली आहे. अनेक कलाकार नानांच्या आठवणी शेअर करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us