Bhagyashree Patwardhan : लग्नानंतर एक वर्ष मी…कुटुंबीयांविरोधात लग्न, भाग्यश्री पटवर्धननं सांगितला रंजक किस्सा

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अभिनेत्रीनं हिमालय दासानी यांच्याशी घरातल्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. आता एका मुलाखतीत अभिनेत्रीनं लग्नानंतरचा खास किस्सा सांगितला आहे.

Bhagyashree Patwardhan : लग्नानंतर एक वर्ष मी...कुटुंबीयांविरोधात लग्न, भाग्यश्री पटवर्धननं सांगितला रंजक किस्सा
| Updated on: Oct 05, 2026 | 2:12 PM

सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धननं ‘मैने प्यार किया‘ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या पहिल्याच सिनेमातून भाग्यश्रीला प्रसिद्धी मिळाली आणि ती घराघरात पोहोचली. भाग्यश्रीच्या निखळ सौंदर्याची चाहत्यांना भुरळ पडली. पहिल्या सिनेमानंतर भाग्यश्रीनं लगेच हिमालय दासानी यांच्यासोबत लग्न केलं. लग्नामुळे अभिनेत्री चर्चेत होती. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत भाग्यश्री पटवर्धननं तिच्या लग्नाच्या खास आठवणी सांगितल्या आहेत.

भाग्यश्री पटवर्धननं सांगितला किस्सा

Loading...

भाग्यश्री पटवर्धननं तिच्या लग्नानंतरचा एक खास किस्सा शेअर केला आहे. भाग्यश्री म्हणाली की, ‘मी माझ्या सासूबाईंना सांगितलं होतं की, लग्नामध्ये नेसण्यासाठी साडी ही तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या आणि मी ती नेसेन. माझी फक्त इच्छा आहे की, माझ्या हातावर मेंदी असली पाहिजे.’

‘लग्नानंतर एक वर्ष मी माझ्या हातावरची मेंदी उतरू दिली नाही. जर मेंदीचा रंग कमी होत गेला, तर मी लगेच मेंदी काढणाऱ्यांना बोलावून मेंदी काढून घ्यायची. तसंच जर मेंदीवाली नसेल तर मी स्वतः मेंदीची वाटी घेऊन बसायचे आणि टूथपिकनं स्वतःच्या हातावर मेंदी काढायचे, त्यामुळे लग्नानंतर एक वर्षभर माझ्या हातावरची मेंदी उतरली नाही.’ असंही भाग्यश्रीनं सांगितलं.

भाग्यश्री पटवर्धनची लव्ह स्टोरी

भाग्यश्री आणि हिमालय दासानी एकाच वर्गात शिकत होते. भाग्यश्री खूप शांत स्वभावाची होती, तर हिमालय सर्वात खोडकर मुलांपैकी एक होते. भाग्यश्री वर्गाची मॉनिटर होती आणि हिमालय यांच्या खोडकरपणामुळे त्यांच्यात सतत भांडणं व्हायची. पण या भांडणाचं रूपांतर प्रेमात होईल हे दोघींनाही माहीत नव्हतं. एका मुलाखतीत भाग्यश्रीने स्वतः सांगितलं की ती गणितात खूप कच्ची होती आणि हिमालय यांची मदत घ्यायची, पण एके दिवशी हिमालय यांनी तिला फोनवर प्रपोज केलं. ‘जेव्हा मी माझ्या वडिलांना याबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार दिला.’ असं भाग्यश्री म्हणालेली. वडिलांचं ऐकून भाग्यश्रीनं त्यावेळी हिमालय यांना नकार दिला, पण त्यांची मैत्री तशीच राहिली.

‘मैने प्यार किया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भाग्यश्री आणि हिमालय यांना भेटणं कठीण झालं होतं. भाग्यश्रीनं तिच्या आणि हिमालय यांच्या लग्नाच्या शक्यतेबद्दल तिच्या आई-वडिलांशी चर्चा केली, पण त्यांनी नकार दिला. नाइलाजानं, दोघांनी आपापल्या कुटुंबांच्या संमतीशिवाय लग्न केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us