Ruchita Jamdar : आम्हीसुद्धा पाचवा सीझन पहिलाय, मला कोणत्या तोंडाने…जान्हवी किल्लेकरला रुचिता जामदारनं सुनावलं, काय घडलं?

Ruchita Jamdar On Jahnavi Killekar : रुचिता जामदार बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेली. यावेळी रुचितावर अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनं टीका केलेली. त्यावर आता रुचितानं प्रतिक्रिया दिली आहे.

Ruchita Jamdar : आम्हीसुद्धा पाचवा सीझन पहिलाय, मला कोणत्या तोंडाने...जान्हवी किल्लेकरला रुचिता जामदारनं सुनावलं, काय घडलं?
| Updated on: Oct 18, 2026 | 9:14 PM

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि नृत्यांगना रुचिता जामदार बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी झालेली. बिग बॉसच्या घरात रुचिता आणि विशाल कोटियनच्या नात्याची चर्चा रंगली. तसेच अनेकदा रुचितानं बिग बॉसमध्ये राडाही घातला. अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक जान्हवी किल्लेकरनं रुचिताबद्दल भाष्य केलेलं. त्यावर आता रुचितानं प्रतिक्रिया दिली असून जान्हवीला चांगलंच सुनावलं आहे.

रुचिता जामदारचं वक्तव्य

Loading...

जान्हवी किल्लेकरबद्दल बोलताना रुचिता जामदार म्हणाली की, ‘लोकांना चर्चेत यायचं असेल तर, चालणाऱ्या रिऍलिटी शोवर सोशल मीडियावर कमेंट करतात. पण, त्याची एक मर्यादा असते. मी बाहेर आल्यानंतर बघितलं, जान्हवीचा आयुष आणि ओंकारसोबत होळीचा कार्यक्रम होता. यादरम्यान, तिनं मुलाखत दिलेली. पण, माझ्याबद्दल ती जे बोलली ते मला समजलं. हेच जर आम्ही केलं, तर लगेच बोललं जातं. मी शोमध्ये विशालच्या प्रेमात आहे, असं बोललेच नाही. तोच बोलला होता. जान्हवी प्रत्येक मुलाखतीमध्ये माझ्याबद्दल बोलत होती. मी कोणीच नसते, तर बिग बॉसमध्ये मला घेतलंच नसतं.’

‘मी थिएटर केलंय, स्विमिंग, जिम्नॅस्टिक, डान्सिंग सगळं शिकली आहे. मी तेव्हाच बोलले असते, पण घरच्यांमुळे मी स्वतःला थांबवलं. हेच जर प्राजक्ता आणि रोशन दादा यांच्यासारखे चांगले स्पर्धक बोलले असते, तर एकवेळ चाललं असतं. पण, जिनके खुद के घर कांच के, ते दुसऱ्यांच्या घरावर कसे काय दगड फेकू शकतात. आम्ही सुद्धा बिग बॉसचा पाचवा सीझन पाहिला आहे. पॅडी दादांसोबत जे झालं, भाषा वापरली गेली, त्यानंतर कोण जेलमध्ये होतं, वर्षा ताईंना बोललं गेलं, तर तुम्ही काय केलं? आणि मला कोणत्या तोंडाने बोलताय.’ असं रुचितानं शेवटी म्हटलं आहे. ‘टेलिचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत रुचिता बोलत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us