
टकाटक या चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकलेली अभिनेत्री प्रणाली भालेरावनं आता काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती नेहमी प्रमाणेच कमालीची हॉट दिसतेय. समुद्राच्या किनाऱ्यावर तिनं हे फोटो क्लिक केले आहेत.

प्रणाली नेहमी हॉट अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

बॉक्स ऑफिसवर तूफान गाजलेला आणि प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला ‘टकाटक’ (Takatak) हा मराठी चित्रपट आता सिक्वेलच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिलिंद कवडेंच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘टकाटक’ने विक्रमी व्यवसाय करत 2019 च्या पूर्वार्धाच्या अखेरीस मराठी सिनेसृष्टीत नवचैतन्य निर्माण केलं होतं.

आता ‘टकाटक 2’ (Takatak 2) ची घोषणा करण्यात आल्याने सिनेसृष्टीत पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

गेले अनेक दिवस प्रणाली ‘टकाटक 2’ च्या सेटवरुन काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होती. आता तिचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.