अखेर ‘त्या’ विषयावर जया बच्चन बोलल्याच, कारण सांगत म्हणाल्या, आमच्याबद्दल…

| Updated on: Mar 07, 2024 | 3:10 PM

Jaya Bachchan : बाॅलिवूड अभिनेत्री जया बच्चन या कायमच चर्चेत असतात. जया बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन या फक्त अभिनयामध्येच नाही तर राजकारणातही सक्रिय आहेत. विषय कोणताही असो स्पष्टपणे आपले मत मांडताना जया बच्चन या कायमच दिसतात.

अखेर त्या विषयावर जया बच्चन बोलल्याच, कारण सांगत म्हणाल्या, आमच्याबद्दल...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. फक्त हेच नाही तर चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही कामयच अमिताभ बच्चन हे दिसतात. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करताना दिसतात. फक्त अमिताभ बच्चन हेच नाही तर अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय हे देखील सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही देखील सोशल मीडियावर सक्रिय असते.

बच्चन कुटुंब हे कायमच चर्चेत असणारे कुटुंब आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते नव्या नवेली नंदापर्यंत जवळपास सर्वचजण सोशल मीडियावर सक्रिय असतात. याला फक्त आणि फक्त जया बच्चन याच अपवाद ठरतात. जया बच्चन कधीच सोशल मीडियावर सक्रिय नसतात. आता याबद्दलच थेट जया बच्चन बोलताना दिसत आहेत. हेच नाही तर सोशल मीडियावर सक्रिय नसण्याचे कारणही त्यांनी सांगितले.

जया बच्चन या म्हणाल्या की, जगाला अगोदरच आमच्याबद्दल बरेच काही माहिती आहे. यामध्ये इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून अजून काही माहिती देण्याची गरज नाहीये. जया बच्चन म्हणाल्या, आमच्यावेळी काॅल बुक करावी लागत असत. बॉयफ्रेंडला काॅल करायचा असेल तर इमरजेंसी काॅल करावा लागत.

यावेळी श्वेता बच्चन ही देखील म्हणते की, काश आम्ही मोठे होताना देखील इंटरनेट असते. यावेळी श्वेता बच्चन ही मुलगी नव्या नवेली नंदा हिला म्हणते की, तू सोशल मीडियावर जास्तच सक्रिय राहते आणि फोटो वगैरे शेअर करते. जया बच्चन यांनी पहिल्यांदाच सोशल मीडियावर सक्रिय नसल्याचे कारण हे सांगितले आहे. जया बच्चन या सोशल मीडियावर जरी सक्रिय नसतील तरीही त्या कायमच चर्चेत असतात.

अनेकदा जया बच्चन या पापाराझींवर भडकताना देखील दिसतात. मात्र, अंबानींच्या पार्टीतून बाहेर पडताना चक्क पापाराझी यांच्याकडे पाहून स्माईल देताना जया बच्चन या दिसल्या. नव्याच्या शोमध्ये मोठे खुलासे करताना कायमच जया बच्चन आणि श्वेता बच्चन या दिसतात. संपूर्ण बच्चन कुटुंब अंबानींच्या पार्टीसाठी जामनगरमध्ये दाखल झाले होते. याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.