बहुत मुश्किलसे बचे आज…..शहनाज गिलच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला, Video Viral

हिंदी अभिनेत्री शहनाज गिलच्या विमानाच्या अपघात थोडक्यात टळला, विमानात अचानक टर्ब्युलन्सची अडचण झाल्याने विमान अचानक जोरजोरात हळू लागले. अभिनेत्रीने वाहेगुरूचा जप करत देवाचा धावा केला.

बहुत मुश्किलसे बचे आज.....शहनाज गिलच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला, Video Viral
shehnaz gill plane accident
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 7:03 PM

शहनाज गिलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेहमी आपल्या खोडकर अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या शहनाजच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला. विमान अपघाताचे सत्र हे चालूच आहे. असाच काहीसा अनुभव पंजाबी आणि बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल हिला आला. अभिनेत्री विमान अपघातातून थोडक्यात बचावली आहे. याचा भयावह व्हिडिओ तिने सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

शहनाज गिल आपल्या भावासोबत म्हणजेच शहनाज बदेशा यांच्यासोबत विमानातून प्रवास करत होती, पण अचानक लँडिगवेळी तिचे विमान जोरजोरात हलू लागले,यामुळे सर्व प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. विमानाचे लँडिग होत असतानाच टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला.विमानात अचानक जोरदार धक्के जाणवू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा व्हिडिओ शहनाजच्या भावाने आपल्या फोनमध्ये कैद केला. त्यातच शहनाज देवाचा धावा करताना दिसत आहे. वाहेगुरू वाहेगुरू म्हणत ती देवाच्या नावाचा जप करताना दिसली. या सगळ्या प्रकरणात तिचा भाऊ तिला शांत करताना दिसत आहे.

 

 

 

शहनाज म्हणाली “बडे मुश्किलसे बचे”

विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग होईपर्यंत प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम होते.असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अखेर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरलं आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला, हा व्हिडिओला कॅप्शन देताना बहुत मुश्किलसे बचे आज…. so greatful we land safely असे शहनाजने लिहिले आहे.

लँडिंगनंतर गणपती बाप्पाचा जयघोष

विमान सुरक्षितपणे जमिनीवर लँड झाल्यानंतर शहनाजने गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शहनाजच्या चाहत्यांनी गॉड ब्लेस यू अशा कमेंट्स करत काळजी दर्शवली आहे.

शहनाजच्या मागे अपघातांची मालिका?

सध्या शहनाजच्या मागे अपघातांची मालिका सुरू आहे की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याआधी इश्कनाम च्या शूटिंगदरम्यानही तिच्यासोबत एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला. धावण्याचा सीन शूट करताना तिची नोजरिंग अचानक तिच्या तोंडात गेली, घशात अडकली. यादरम्यान सहकलाकार सौरभ सचदेवने तिची मदत केली होती.

शहनाजच्या हा फ्लाईटचा अनुभव पाहून चाहत्यांची धाकधूक वाढली होती. मात्र सगळ्यात महत्त्वाच म्हणजे विमानाचे अखेर सुरक्षितपणे लँडिंग झाले आहे, शहनाज गिल आणि तिचा भाऊ शहनाज बदेशा सुखरूप आहेत

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us