Video : ‘हार्ट ऑफ स्टोन’चा फर्स्ट लूक आऊट, पाहा आलिया भट्टचा ॲक्शन सीन

| Updated on: Sep 25, 2022 | 11:09 AM

चित्रपटाच्या फर्स्ट लूकच्या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट देखील दिसत आहे. यामध्ये आलियाचे देखील काही सीन्स दाखवण्यात आले आहेत.

Video : हार्ट ऑफ स्टोनचा फर्स्ट लूक आऊट, पाहा आलिया भट्टचा ॲक्शन सीन
Follow us on

मुंबई : नेटफ्लिक्सच्या आगामी ‘हार्ट ऑफ स्टोन’चा (Heart of Stone) फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही हॉलिवूडमध्ये (Hollywood) पदार्पण करत आहे. हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटामध्ये जेमी डोर्नन आणि गॅल गॅडोट प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट (Movie) ॲक्शनवर आधारित असल्याचे फर्स्ट लूकमधून दिसते आहे. हार्ट ऑफ स्टोनचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसते आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला 2023 मध्ये येणार आहे.

इथे पाहा चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा व्हिडीओ

हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाच्या फर्स्ट लूक रिलीज

हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये दिसते आहे की, आलिया भट्ट देखील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. व्हिडिओची सुरुवात रस्त्यावरून आणि वाळवंटातून वेगाने जाणार्‍या बाइकच्या शॉट्सने होते. तेवढ्यात एक आवाज येतो, तुम्ही कशासाठी साइन अप केले हे तुम्हाला माहिती आहे…कोणी मित्र नाहीत, नातेसंबंध नाही. आपण काय करतो ते खूप महत्वाचे आहे…असे म्हटले जाते. त्यानंतर व्हिडीओमध्ये बरेच ॲक्शन सीन दाखवण्यात आले आहेत.

व्हिडीओमध्ये आलिया भट्टचा दिसतोय दमदार अभिनय

चित्रपटाच्या फर्स्ट लूकच्या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट देखील दिसत आहे. यामध्ये आलियाचे देखील काही सीन्स दाखवण्यात आले आहेत. हार्ट ऑफ स्टोन या हॉलिवूड चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते आहे. इतकेच नाही तर आलिया या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. यामुळे आलियाच्या भारतामधील चाहत्यांना या चित्रपटाबद्दल मोठे क्रेझ आहे.