Shammi Kapoor Birth Anniversary | भारतात लाँच होण्यापूर्वीच इंटरनेट वापरायचे शम्मी कपूर, शेवटपर्यंत सोशल मीडियावर होते सक्रिय…

| Updated on: Oct 21, 2021 | 8:35 AM

बॉलिवूड अभिनेता शम्मी कपूर (Shammi kapoor) यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. शम्मी कपूर जरी कधी मोथे सुपरस्टार बनले नाहीत, पण त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत.

Shammi Kapoor Birth Anniversary | भारतात लाँच होण्यापूर्वीच इंटरनेट वापरायचे शम्मी कपूर, शेवटपर्यंत सोशल मीडियावर होते सक्रिय...
Shammi Kapoor
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शम्मी कपूर (Shammi kapoor) यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. शम्मी कपूर जरी कधी मोथे सुपरस्टार बनले नाहीत, पण त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट दिले आहेत. शम्मी यांनी 1953च्या ‘जीवन ज्योती’ चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण केले आणि रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता, ज्यात त्यांनी एक छोटी पण संस्मरणीय भूमिका साकारली होती. चला तर, शम्मीच्या वाढदिवसाला, त्याच्याशी संबंधित काही अज्ञात गोष्टींबद्दल जाणून घेऊया…

शम्मी कपूर यांनी 50च्या दशकात चित्रपटांमध्ये काम केले. त्याच वेळी, अमेरिकन गायक आणि अभिनेता एल्विस प्रेस्ली देखील जगभर प्रसिद्ध होते. शम्मी कपूर आणि एल्विस प्रेस्ली यांच्या लुक आणि डान्समध्ये बरेच साम्य होते आणि म्हणूनच शम्मी यांना बॉलिवूडचा एल्विस प्रेस्ली म्हटले जाऊ लागले.

पृथ्वी थिएटरमध्ये 50 रुपये पगारावर काम करायचे!

शम्मी कपूरने आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरमध्ये 50 रुपयांच्या नोकरीतून करिअरला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी कनिष्ठ कलाकार म्हणून काम केले. 1952 मध्ये 4 वर्षांनी त्यांनी ही नोकरी सोडली आणि त्यावेळी शम्मी यांना 300 रुपये प्रति महिना पगार मिळत असे.

सुरुवातीला एकही चित्रपट चालला नाही…

1953 मध्ये शम्मी कपूर यांनी लीला मिश्रा आणि शशिकला यांच्यासोबत ‘जीवन ज्योती’ चित्रपटातून पदार्पण केले. सुरुवातीला लोकांना शम्मीचे चित्रपट अजिबात आवडले नाहीत. शम्मी कपूर नंतर ‘तुमसा नहीं देखो’, ‘दिल देके देखो’, ‘जंगली’, ‘काश्मीर की कली’, ‘तिसरी मंजिल’, ‘एन इव्हिनिंग इन पॅरिस’, ‘ब्रह्मचारी’, ‘प्रिन्स’ आणि ‘अंदाज’ मध्ये दिसले. अनेक उत्तम चित्रपट दिले, ज्यात लोकांना शम्मी कपूर यांची शैली खूप आवडली.

स्वतःच नृत्य कोरिओग्राफ करायचे!

ज्या युगात शम्मी कपूर चित्रपट करत होते, त्या काळात नायक चित्रपटांमध्ये नाचत नव्हते. पण शम्मी कपूर यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये केवळ नृत्यच केले नाही, तर स्वतः गाण्यांना कोरिओग्राफ देखील केले. शम्मी कपूर यांना त्याच्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफरची कधीच गरज भासली नाही. त्यावेळी शम्मी कपूर यांच्या नृत्याला ‘गर्दन तोड’ नृत्य असे नाव देण्यात आले होते.

भारतात लाँच होण्यापूर्वीच इंटरनेट वापरायचे!

शम्मी कपूर नवीन तंत्रज्ञानाच्या खूप प्रेमात होते. 1995 मध्ये भारतात इंटरनेट आले, परंतु शम्मी कपूर 1994पासून अॅपलद्वारे इंटरनेट वापरत होते. यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक इंटरनेट संघटना स्थापन केल्या होत्या आणि शम्मी कपूर कपूर कुटुंबाची वेबसाईट देखील सांभाळत असत. आयुष्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत शम्मी कपूर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होते.

पत्नीच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये गेले शम्मी कपूर

शम्मी कपूरने अभिनेत्री गीता बाली यांच्याशी लग्न केले. 1955 मध्ये ‘रंगीन रातें’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली. तथापि, 1965 मध्ये गीता बाली यांचे निधन झाले, त्यानंतर शम्मी कपूर नैराश्यात गेले. 4 वर्षांनंतर, शम्मीने नीला देवीसोबत दुसरे लग्न केले, पण त्यांनी एक अट घातली होती की, नीला कधीही आई होणार नाहीत आणि गीता बालीची मुले आदित्य आणि कांचनला स्वतःच्या अपत्याप्रमाणे पालनपोषण करतील.

हेही वाचा :

‘झिम्मा’वर थिरकणार अवघा महाराष्ट्र, नव्या मराठी चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

Neena Gupta : लहानपणी शोषणाला बळी पडल्या होत्या नीना गुप्ता; म्हणाल्या, ‘आईला सांगितलं नाही कारण…’

प्रियांका चोप्राच्या तजेल त्वचेचं रहस्य, म्हणते, टेन्शन नाही, घरच्या घरी अशी घ्या काळजी!