‘झिम्मा’वर थिरकणार अवघा महाराष्ट्र, नव्या मराठी चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

'झिम्मा' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. 'झिम्मा' कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

'झिम्मा'वर थिरकणार अवघा महाराष्ट्र, नव्या मराठी चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
Jhimma


मुंबई : ‘झिम्मा’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. ‘झिम्मा’ कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे जबरदस्त गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. “खेळू झिम्मा गं.…” हे या गाण्याचे बोल असून या मोन्टाज सॅान्गचे शब्द आणि चाल संगीतप्रेमींना थिरकवणारे आहे. ट्रेलरमध्येच या गाण्याची झलक आपण पाहिली आणि ऐकली आहे.

हे उत्स्फुर्तदायी गाणे वेगवेगळ्या वयोगटातील मैत्रिणींच्या प्रवासातील मजामस्तीवर चित्रित करण्यात आले आहे.  त्यामुळे हे गाणे ऐकताना आपल्याला आपल्या सहलीची आणि मैत्रीची आठवण आल्यावाचून राहणार नाही. अमितराज यांनी या धमाल गाण्याला संगीत दिले असून वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे, आरती केळकर, सुहास जोशी यांनी हे गाणे गायले आहे. ‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ चित्रपट 19 नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

पाहा गाणे :

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ हा  लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट आहे. वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंड ला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे.

महिलांच्या जबाबदारीचं दर्शन घडवणारा चित्रपट

इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र टिझर पाहून तरी ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.

कलाकारांची फौज

सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे.  या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा :

Raja Rani Chi Ga Jodi : संजीवनी रणजीत ढाले पाटलांचा SWAG, पाहा अभिनेत्री शिवानी सोनारचे खास फोटो

Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा, बदलणार देशमुखांच्या घराची सूत्र!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI