AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंदू मुलींचं बळजबरी धर्मांतरण, लव जिहाद आणि…, नक्की घडतंय तरी काय? राहुल गांधी म्हणाले, ‘फक्त लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी…’

Rahul Gandhi on The Kerala Story 2: हिंदू मुलींचं बळजबरी धर्मांतरण, लव जिहाद आणि..., 'द केरळ स्टोरी 2' सिनेमाबद्दल राहुल गांधी यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं. प्रोपेगेंडा सिनेमा म्हणत राहुल गांधी यांनी, 'फक्त लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी...', असं वक्तव्य केलं आहे...

हिंदू मुलींचं बळजबरी धर्मांतरण, लव जिहाद आणि...,  नक्की घडतंय तरी काय? राहुल गांधी म्हणाले, 'फक्त लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी...'
Rahul Gandhi
| Updated on: Mar 08, 2026 | 11:23 AM
Share

Rahul Gandhi on The Kerala Story 2: अनेक वादग्रस्त परिस्थितीचा सामना केल्यानंतर ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अनेकांनी पसंती दर्शवली तर अनेकांनी सिनेमावर टीका केली आहे. फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम सिनेमा करत आहे… असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सिनेमाबद्दल स्वतःचं मत व्यक्त करत टीका केली आहे. त्यांनी हा सिनेमा प्रोपेगेंडा असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी सिनेमावर टीका केली आणि तो समाजात फूट पाडणारा सिनेमा असल्याचं म्हटलं. कुरिक्कनम येथील मारियन कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पाहिला जात नाही हे चांगलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, ‘द केरल स्टोरी 2’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. बरेच लोक केरळची संस्कृती आणि परंपरा योग्यरित्या समजून घेत नाहीत. सिनेमा, टीव्ही आणि माध्यमांचा वापर शस्त्र म्हणून केला जात आहे… असं देखील राहुल गांधी म्हणाले.

पुढे राहुल गांधी म्हणाले, ‘सिनेमाचा वापर लोकांना कुप्रसिद्ध करण्यासाठी केला आहे… धर्माला वेगळं करणं आणि समाजात दरी निर्माण करण्याचं काम सिनेमा करत आहे… अशा गोष्टी देशासाठी अत्यंत हानिकारक आहेत… अशा गोष्टींच्या प्रचारासाठी मोठी रक्कम खर्च होत आहे… ज्यामुळे देशाच्या सामाजिक प्रतिष्ठेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यांनी पुढे म्हटलं की, अशा सिनेमांमुळे देशात असमानता आणि तणाव वाढतो.’

‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमावर वाद…

‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाची कथा तीन मुलींच्या आयुष्याभोवती फिरत आहे… महिला वेगवेगळ्या राज्यातील असतात आणि कुटुंबियांच्या विरोधात जात मुली मुस्लीम मुलांसोबत लग्न करतात. त्यानंतर त्यांचं बळजबरी धर्मांतरण केलं जातं… सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सिनेमाचा विरोध केला.

अनेक राजकीय नेत्यांनी या सिनेमावर टीका केली. सिनेमात केरळचं नकारात्मक चित्रण केलं आहे आणि ते जातीय द्वेषाला चिथावणी देत ​​असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. सिनेमावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. पण कोर्टाच्या आदेशानंतर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला… 28 ते 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने आतापर्यंत फक्त 25 कोटींची कमाई केली आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक