AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखी सावंतचा मौंजुलिका अवतार पाहून तुम्हीही पोट धरून हसाल; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात भुलभुलैय्याचा गोंधळ

या सगळ्या वेगवेगळ्या पात्रांमुळे बिग बॉस मराठीचं घर काही काळासाठी जणू एखाद्या मजेदार नाटकाच्या रंगमंचात बदलल्यासारखं वाटतं. कविता, नाट्य, वेडेपणा आणि विनोद यांचं मिश्रण प्रेक्षकांसाठी एक वेगळाच मनोरंजनाचा अनुभव घेऊन येणार आहे.

| Updated on: Mar 08, 2026 | 11:22 AM
Share
बिग बॉस मराठीच्या घरात येणाऱ्या भागात प्रेक्षकांना एक भन्नाट आणि वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य वेगवेगळ्या हटके पात्रांच्या अवतारात दिसत असून घरात अक्षरशः ‘भूल भुलैय्या’सारखी मजेशीर धमाल रंगताना दिसते.

1 / 5
या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याला एक खास पात्र दिलं गेलं आहे. त्यामुळे घरातील वातावरण काही काळासाठी पूर्णपणे बदललेलं दिसतं. कधी कविता, कधी नाट्यमय एण्ट्री तर कधी वेडसर गमतीजमती.. अशा सगळ्या प्रकारांनी घरात हशा आणि गोंधळ दोन्ही निर्माण होणार असल्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळते.

2 / 5
या सगळ्या रंगतदार वातावरणात संकेत पाठक ‘कवी कुमार’ या अनोख्या अवतारात दिसतो. या भूमिकेत तो घरात कविता सादर करताना दिसणार आहे. त्याच्या कविता ऐकून घरातील सदस्य खळखळून हसतील की थोडेसे कंटाळतील, हे पाहणंही तेवढंच मजेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे, संकेतच्या कवितांवर घरातील सदस्यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच मजेदार असणार असल्याचं प्रोमोमधून दिसून येतं.

3 / 5
दरम्यान, राखी सावंत ‘जुली मौंजुलिका’ या पात्रात दिसणार आहे. तिचा नेहमीचा नाट्यमय अंदाज या पात्रात आणखी रंग भरताना दिसतो. तिच्या एण्ट्रीमुळे घरात गोंधळ, नाट्य आणि हास्य एकाच वेळी पाहायला मिळणार असल्याची झलक प्रोमोमध्ये दिसते.

4 / 5
तर रुचिका ‘खुली मौंजुलिका’ बनून घरात एक वेगळाच अंदाज घेऊन येते. तिचा मस्तीखोर आणि थोडासा वेडसर स्वभाव या पात्राला अजून रंगतदार बनवतो. याशिवाय प्रभू ‘वेडा लवर’ या भूमिकेत दिसणार आहे. या पात्रामुळे घरात अजून काही मजेशीर प्रसंग घडताना दिसणार आहेत.

5 / 5
Follow Us
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! संभाजी ब्रिगेड आक्रमक
MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड आक्रमक; नेमकं काय घडलं?
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय...
MPSC Paper Leaked | संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं 'ते' कृत्य; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची...
Sanjay Raut | नांदेडचा विकास तुमसे ना हो पायेगा', ठाकरे गटाच्या अजब आंदोलनाची तुफान चर्चा
अखेर ठरलं! मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
अखेर ठरलं! उद्या अंतरवलीत मोठी बैठक; मनोज जरांगे उद्या मुंबईकूचची तारीख जाहीर करणार
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही..
काँग्रेसमधील बडा नेता तातडीने राज्यपालांच्या भेटीला; बैठकीचं कारणंही आलं समोर
नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
Mumbai Modi Express | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा! नितेश राणेंच्या पुढाकाराने मोदी एक्सप्रेस मुंबईहून कोकणाकडे रवाना
जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... दीपकेंचा सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | जरांगेंना हात लावण्याचा प्रयत्न केला तर... अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत...
वर्तमान पत्रात वाचलंय मी... छगन भुजबळ यांनी बड्या नेत्याचं नाव घेत नेमकं काय सांगितलं?
BRICS परिषदेसाठी दिल्ली सज्ज, पुतिन जिनपिंग मोदींच्या भेटीकडे लक्ष
BRICS परिषदेसाठी दिल्लीत मोठ्या हालचाली, पुतिन जिनपिंग आणि PM मोदींच्या भेटीकडे लक्ष
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार
जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता...