AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali Party 2026 : यंदा घरी दिवाळी पार्टी प्लॅन करताय? कपड्यांपासून मेन्यूपर्यंत ही चेकलिस्ट ठरेल उपयोगी

घराला फुलांच्या माळा, दिवे आणि आकर्षक लाइटिंगने घराला सजवा. पाहुण्यांच्या स्वागतापासून मनोरंजनापर्यंत प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंगच्या मदतीसाठी ही चेकलिस्ट तुम्हाला मदत करेल.

Diwali Party 2026 :  यंदा घरी दिवाळी पार्टी प्लॅन करताय? कपड्यांपासून मेन्यूपर्यंत ही चेकलिस्ट ठरेल उपयोगी
diwali party Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 31, 2026 | 8:13 PM
Share

हिंदू धर्मात, दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण प्रकाश, आनंद, प्रेम, समृद्धी आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी.या सणाच्या दिवशी, लोक देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांची पूजा करतात. कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत हा सण आनंदाने साजरा केला जातो.

पण हल्ली दिवाळी पार्टीचा एक नवा ट्रेंड आलाय. दिवाळीच्या दिवसांत मित्रमंडळींना दिवाळी पार्टीचे निमंत्रण दिले जाते. आपल्या माणसांसोबत सण साजरा करता यावा. आपल्या माणसांना अधिक समजून घेता यावं हा यामागचा उद्देश असतो. बहुतेक पार्टिंचे आयोजन हे घरच्या घरीच केले जाते. त्यामुळे आम्ही दिवाळी पार्ट्यांसाठी एक चेकलिस्ट घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमचे काम सोपे होणार आहे.

दिवाळी पार्टी ड्रेस कोड

पार्टी अविस्मरणीय आणि मजेदार बनवण्यासाठी, ड्रेस कोड निश्चित करा. यामुळे पार्टी स्पेशल बनण्यास मदत होते. महिला दिवाळी पार्टिसाठी साडी, लेहेंगा किंवा अनारकली यांसारखे भारतीय पोशाख निवडू शकता. तर पुरूष, कुर्ता-पायजमा किंवा नेहरू जॅकेट घालू शकता. सोनेरी, लाल, मरून किंवा गुलाबी या रंगांच्या कपड्यांमुळे तुमचा लूक आणखी खूलून दिसेल.

 मेनू सेट करा

तुम्ही तुमच्या पाहुण्यांनुसार मेन्यूमध्ये बदल करू शकता, पण त्यात स्टार्टर्स, मुख्य पदार्थ आणि डेझर्ट्सचा समावेश करणे गरजेचेच आहे. उदा.

स्टार्टर : पनीर टिक्का, व्हेज कबाब, समोसा आणि कचोरी, चाट आणि गोलगप्पे

थंड पेये : व्हर्जिन मोजीटो

मुख्य कोर्स : शाही पनीर, डाळ मखनी, व्हेज पुलाव, नान आणि पुरी, रायता आणि सॅलड

 पार्टी मजेदार बनवणारे खेळ

पार्टी मजेदार बनवण्यासाठी खेळ असणे आवश्यक आहे. खेळ नसतील तर, लोकांना फार मज्जा येणार नाही. पार्टी एकदम बोरींग होईल आणि गेस्ट एकमेकांशी बोलण्याऐवजी फोनमध्येच घुसून राहतील. तुमच्या दिवाळी पार्टीमध्ये तांबोळा, अंताक्षरी, दिवा सजावट स्पर्धा, बॉलीवूड क्विझ आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण यांसारख्या मजेदार खेळांचा समावेश करा. विजेत्यांना छोटी बक्षिसे द्या.

पार्टीची वेळ निश्चित करा

जर पार्टीची वेळ निश्चित केली असेल, तर तुमचे पाहुणे वेळेवर येतील आणि पार्टीचा पुरेपूर आनंद घेतील. पार्टीची आमंत्रणे पाठवताना, त्यासोबत एक वेळापत्रक समाविष्ट करा.

पार्टीसाठी घराची सजावट

पार्टीसाठी घर व्यवस्थित सजवणे फार महत्त्वाचे आहे. पार्टिसाठी घर सुंदर दिसलेच पाहिजे. मेन डोअरवर फुलांच्या माळा लावा. घराभोवती लाईंटिंग सोडा, दिव्यांनी रोषणाई करा. एक सुंदर फोटो बूथ तयार करा. कॅन्डल्सचे डेकोरेशन देखील करू शकता.

Follow Us
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी