Anant Ambani Gift: सायकलवरुन डिलिव्हरी देत होता तरुण, अनंत अंबानी यांनी दिले असे गिफ्ट की..डोळ्यांतून आले अश्रू
मुंबईतील प्रगतीत येथील प्रत्येक नागरिकांचा हातभार लागत आहे. ब्लिंकिट एजंटना उन्हा पावसात काम करावे लागत असते. अशा एका डिविव्हरी एजंटला थेट उद्योजक अनंक अंबानी यांनी गिफ्ट दिले आहे.

मुंबई सगळ्यांची पोशिंदी आहे. त्यामुळे मुंबईत कचरा वेचणाऱ्यालाही दोन वेळचे जेवण मिळते.अशा मुंबईतील मेहनत करणाऱ्या नागरिकांना शोधून त्यांना सरप्राईज गिफ्ट देण्याचे काम रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पूत्र अनंत अंबानी यांनी सुरु केले आहे. एका ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटला सायकल वरुन त्याची डिलिव्हरी करताना पाहून अनंत अंबानी यांनी त्याला असे गिफ्ट दिले की त्या डिलीव्हरी एजंटच्या डोळ्यांना अश्रुंच्या धारा लागल्या.
Viral व्हिडीओ नेमके काय ?
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओत दिसत आहे की हुसैन मंसूरी यांनी सुजीत नावाच्या एका गिग वर्करला अडवले. जो ब्लिंकिट ऑर्डर पोहचवण्यासाठी त्याच्या सायकलीचा वापर करत होता. त्याचे नाव विचारले त्यानंतर मंसूरी यांनी त्याला बाईक का खरेदी केली नाही असा प्रश्न केला. त्यावर सुजीत नावाच्या डिलिव्हरी एजंटने आपली अडचण सांगितली, तो म्हणाला की एवढ्या कमी पैशात कुठून बाईक खरेदी करणार?
ब्लिंकिट एजंटला अनंत अंबानीची भेट
Blinkit एजंटने आपली अडचण सांगितल्यानंतर मंसूरी यांनी सुजित याला डिलिव्हरी पूर्ण करुन येण्यास सांगितले आणि त्याला सरप्राईज देणार असल्याचे सांगितले. जेव्हा तो डिलिव्हरी एजंट परत आला तर मंसूरी यांनी त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि त्याला लाल कव्हरमध्ये गुंडाळेल्या गिफ्टकडे नेले. गिफ्ट दाखवून मंसुरी यांनी सांगितले की ही बाईक तुम्हाला अनंत अंबानी यांच्या मार्फत छोटीशी गिफ्ट आहे.
वास्तविक लाल कव्हरच्या खाली एक नवीकोर स्कूटर होती. सूजील याला जेव्हा कळले की त्याला काय गिफ्ट मिळाले आहे तेव्हा त्याने मंसूरी याची गळाभेट घेतली आणि तो ओक्साबोक्सी रडू लागला. आपल्या भावनांना आवरत त्याने हळू आवाजात म्हटले की Thank You Sir !
अनंत अंबानी फाऊंडेशनने दिले गिफ्ट
बातमीनुसार ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटला ही स्कूटरची गिफ्ट अनंत सेवा फाऊंडेशनच्या मोहिमेचा एक भाग होता. राहुल कनाल आणि हुसैन मंसूरी यांच्या सोबत मिळून ही फाऊंडेशनने मुंबईतील घाम गाळून या शहराच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या कष्टकरी लोकांना इलेक्ट्रीक बाईक गिफ्ट दिली जात आहे.
येथे पोस्ट पाहा –
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हिडीओ Viral
अनंत अंबानी यांच्या वतीने ब्लिंकिट एजंटला दिलेल्या या गिफ्टचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बातमी लिहीपर्यंत या व्हिडीओला ४६ मिलियनहून अधिक व्यूज मिळाले आहेत.
