AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो फोन शेवटचा ठरला! त्यानंतर तिरंग्यात गुंडाळलेलं मुलाचं पार्थिवच घरी आलं; महाराष्ट्राच्या वीरपुत्रासोबत नेमकं काय घडलं?

आसाममधील सुखोई-३० विमान अपघातात नागपूरचे फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गाकर शहीद झाले आहेत. वयाच्या २८ व्या वर्षी देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीरपुत्रावर मानेवाडा घाटात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तो फोन शेवटचा ठरला! त्यानंतर तिरंग्यात गुंडाळलेलं मुलाचं पार्थिवच घरी आलं; महाराष्ट्राच्या वीरपुत्रासोबत नेमकं काय घडलं?
Purvesh Durgakar
| Updated on: Mar 08, 2026 | 11:26 AM
Share

आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या नागपूरच्या सुपुत्र वीरमरण आल्याची घटना समोर आली आहे. आसाममधील सुखोई-३० या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात नागपुरातील फ्लाईट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गाकर (२८) यांचे निधन झाले. शनिवारी नागपूरच्या मानेवाडा घाटावर शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नेमकं काय घडलं?

गुरुवारी आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू-३० एमकेआय हे लढाऊ विमान कोसळले. जोरहाट हवाई तळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या भीषण अपघातात पूर्वेश दुर्गाकर आणि स्क्वॉड्रन लीडर अनुज या दोन तरुण अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. ही बातमी नागपुरात धडकताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.

पूर्वेश हे नागपुरातील न्यू सुभेदार लेआउट येथे राहायचे. त्यांचे वडील रवींद्र दुर्गाकर हे रेल्वेतून निवृत्त झाले आहेत. पूर्वेशला लहानपणापासूनच आकाशात झेप घेण्याची ओढ होती. नागपुरात शिक्षण पूर्ण करतानाच त्याने भारतीय हवाई दलात जाण्याचे ध्येय निश्चित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेल्या पूर्वेशने ऑपरेशन सिंदूर सारख्या महत्त्वाच्या मोहिमेतही आपले योगदान दिले होते.

पूर्वेशने बुधवारीच त्यांच्या वडिलांशी गप्पा मारल्या होत्या. तेव्हा त्याने सर्व काही ठीक आहे, असे सांगितले. यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या एका फोनने दुर्गाकर कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले. शनिवारी सकाळी पूर्वेशचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले.

लेकाला तिरंग्यात गुंडाळलेलं पाहून आईचा बांध फुटला

आपल्या लाडक्या लेकाला तिरंग्यात गुंडाळलेलं पाहून आईचा बांध फुटला. ती जोरजोरात रडू लागली. यावेळी आई, वडील आणि अमेरिकेहून आलेली बहीण यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. काही दिवसांपूर्वीच पूर्वेश सुट्टीसाठी घरी आला होता. तेव्हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र वेळ घालवला होता. त्यावेळी कुटुंबाला पूर्वेशची ती भेट शेवटची ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.

यावेळी नागपूरच्या मानेवाडा घाटावर हवाई दलाच्या जवानांनी हवेत गोळ्या झाडून आणि तोफांची सलामी देऊन अखेरची मानवंदना दिली. पूर्वेश दुर्गाकर अमर रहे आणि भारत माता की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर वडील रवींद्र दुर्गाकर यांनी जड अंतःकरणाने आपल्या पुत्राला मुखाग्नी दिला. पूर्वेश फक्त २८ वर्षांचा होता. पण त्याची ही शौर्यगाथा येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील.

Follow Us
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.