‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाला सपोर्ट करत पोस्ट केल्याने हृतिक रोशनविरोधात नाराजीची लाट, ‘विक्रम वेधा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी…

| Updated on: Aug 15, 2022 | 9:57 AM

आमिर खानचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'ला सपोर्ट करताना हृतिक रोशन दिसला. हृतिकने चित्रपटाला पाठिंबा दिल्यापासून लोक त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. त्यामुळे त्याचा इफेक्ट त्याच्या आगामी चित्रपटावर पाहायला मिळणार आहे.

लाल सिंह चड्ढा चित्रपटाला सपोर्ट करत पोस्ट केल्याने हृतिक रोशनविरोधात नाराजीची लाट, विक्रम वेधावर बहिष्कार टाकण्याची मागणी...
Follow us on

मुंबई : आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला सोशल मीडियातून प्रचंड विरोध होतोयं. ज्याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवरही होत आहे. बाॅलिवूडचे अनेक स्टार्स आता लाल सिंह चड्ढाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचे चित्र बघायला मिळते आहे. यामध्ये अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) या चित्रपटाचे समर्थन केले आहे, ज्यामुळे तो ट्रोल देखील होऊ लागला आहे. आमिरच्या चित्रपटाला हृतिक रोशनला सपोर्ट करताना पाहून लोक त्याच्यावर नाराज झाले आहेत. ज्याचा परिणाम आता त्याच्या आगामी चित्रपट (Movie) विक्रम वेधावर होऊ शकतो.

इथे पाहा हृतिक सोशनने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट

लाल सिंह चड्ढा चित्रपटाला सपोर्ट करणे हृतिक महाग पडणार?

आमिर खानचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ला सपोर्ट करताना हृतिक रोशन दिसला. हृतिकने चित्रपटाला पाठिंबा दिल्यापासून लोक त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. त्यामुळे त्याचा इफेक्ट त्याच्या आगामी चित्रपटावर पाहायला मिळणार आहे. आता लोकांनी त्याच्या विक्रम वेधा या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केलीयं. यामुळे आमिर खानच्या चित्रपटाला समर्थ करण्याच्या नादामध्ये हृतिक रोशनने स्वत: च्या समस्यांमध्ये मोठी वाढ करून घेतल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

हृतिक रोशनविरोधात सोशल मीडियावर नाराजगीची लाट

हृतिक रोशनने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे समर्थन करताना एक स्टोरी पोस्ट केलीयं. ज्यामध्ये त्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, लाल सिंह चड्ढा पाहा. हा चित्रपट मी मनापासून अनुभवला. प्लस आणि कमी बाजूला ठेवून, हा चित्रपट छान आहे. हा अप्रतिम चित्रपट चुकवू नका. जा आणि आता पहा, खूप सुंदर आहे. अशाप्रकारची पोस्ट हृतिकने सोशल मीडियावर शेअर करत आमिरच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाला सपोर्ट केलायं. हृतिक रोशनचा आगामी चित्रपट विक्रम वेधा हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात हृतिकसोबत सैफ अली खानही दिसणार आहे.