AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Independence Day | जश्न-ए-आझादी…, सलमान खानपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत सर्वांनी तिरंगा फडकावत देशवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

रजनीकांतपासून ते सलमान खानपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी केलीयं. इतकेच नाही तर यासंबधितचे काही फोटो सोशल मिडियावर (Social media) आपल्या चाहत्यांसाठी शेअर देखील केले आहेत.

Independence Day | जश्न-ए-आझादी..., सलमान खानपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत सर्वांनी तिरंगा फडकावत देशवासियांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
| Edited By: | Updated on: Aug 15, 2022 | 10:58 AM
Share

मुंबई : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. आझादी का अमृत महोत्सव देशभर साजरा होत आहे. यानिमित्ताने हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारकडून राबवण्यात आला. आज संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात मग्न आहे. या खास प्रसंगी बॉलिवूड (Bollywood) स्टार्स प्रत्येक देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. यासोबतच ध्वज फडकवून सर्वांना शुभेच्छा देताना दिसतायंत. रजनीकांतपासून ते सलमान खानपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी केलीयं. इतकेच नाही तर यासंबधितचे काही फोटो सोशल मिडियावर (Social media) आपल्या चाहत्यांसाठी शेअर देखील केले आहेत.

पाहा सलमान खानने शेअर केलेली पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर देशाचा झेंडा फडकावत एक फोटो शेअर केला आहे. यासोबतच सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. अभिनेत्याच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

रजनीकांत यांनी शेअर केलेली पोस्ट पाहा

ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनीही संपूर्ण देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यासोबतच रजनीकांत यांनी जयहिंद हा हॅशटॅगही लिहिला आहे.

कार्तिक आर्यनने घराच्या बाल्कनीतून दिल्या शुभेच्छा

कार्तिक आर्यननेही घराच्या बाल्कनीतून दोन्ही हात जोडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या बाल्कनीच्या रेलिंगवरही तिरंगा दिसतो.

उर्वशीची पाहा सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट

स्वातंत्र्याच्या या खास प्रसंगी उर्वशी रौतेला संपूर्ण देशाला सलाम करताना दिसली. हातात झेंडा घेऊन अभिनेत्री तिरंग्याला सलाम करते आहे.

शाहरुख खानने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट इथे पाहा

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह तिरंगा फडकवताना दिसला. शाहरुख, गौरी आर्यन, अबराम यांनी तिरंग्यासमोर पोज देत शुभेच्छा दिल्या.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.