एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली की, आम्ही आताही…

| Updated on: Oct 01, 2022 | 9:45 AM

रश्मिका मंदाना प्रचंड चर्चेत आहे. मात्र, यावेळी ती चित्रपटामुळे किंवा तिने केलेल्या अभिनयामुळे नाही तर तिने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रश्मिका चर्चेत आलीये.

एक्स बॉयफ्रेंडबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली की, आम्ही आताही...
Follow us on

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलय. रश्मिका आणि अमिताभ बच्चन यांचा बहुप्रतिक्षित ‘गुड बाय’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणचे बॉलिवूडमध्येही (Bollywood) आपली जादू दाखवण्यासाठी रश्मिका सज्ज झालीये. नुकताच एका कार्यक्रमाला रश्मिकाने हजेरी लावली होती. यावेळी तिने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमानसोबत सामी सामी गाण्यावर डान्स केला. सलमान आणि रश्मिकाचा हा डान्स व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालाय.

सध्या रश्मिका मंदाना प्रचंड चर्चेत आहे. मात्र, यावेळी ती चित्रपटामुळे किंवा तिने केलेल्या अभिनयामुळे नाही तर तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रश्मिका चर्चेत आलीये. गेल्या काही वर्षांपासून रश्मिकाच्या फॅन फाॅलोइंगमध्ये सातत्याने मोठी वाढ होते आहे. रश्मिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केलीये.

एक्स-बॉयफ्रेंडबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली की, माझा एक्स-बॉयफ्रेंड आणि मी आजही खूप चांगले मित्र आहोत. जर एखाद्या पार्टीमध्ये मी आणि माझा बॉयफ्रेंड असू आणि एक्स बॉयफ्रेंड भेटला तर आम्ही हाय करतो आणि एकमेकांसोबत बोलतो देखील…इतकेच नाही तर मी आजही एक्स बॉयफ्रेंडच्या फॅमिलीसोबत, त्याच्या मित्रांसोबत चांगल्या गप्पा मारते. यामध्ये काही चुकीचे नाहीये.

आजही माझा एक्स बॉयफ्रेंड माझा चांगला मित्र आहे आणि का नसावा? रश्मिकाचा यापूर्वी रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा झाला होता. बरेच दिवस हे डेट देखील करत होते. मात्र, रश्मिका आणि रक्षितच्या रिलेशनमध्ये काही प्राॅब्लेम निर्माण होत असल्याने ते विभक्त झाले होते आणि याची माहिती त्यांनी 2018 मध्ये चाहत्यांसोबत शेअर केली होती.