गाणं तयार करताना वाद विकोपाला गेले, मात्र गाण्याच्या शब्दांनीच गैरसमज दूर झाले! वाचा ‘छोटीसी ये दुनिया’ गाण्याचा किस्सा…

| Updated on: Aug 21, 2021 | 7:28 AM

‘रंगोली’मध्ये ‘छोटीसी ये दुनिया, पहेचाने रास्ते’ हे सुंदर गीत आणि त्याची दोन रूपं होती. ‘रंगोली’चे नायक किशोरकुमार यांच्या आवाजात तसंच नायिका वैजयंतीमाला यांच्यासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित केलं गेलं होतं.

गाणं तयार करताना वाद विकोपाला गेले, मात्र गाण्याच्या शब्दांनीच गैरसमज दूर झाले! वाचा ‘छोटीसी ये दुनिया’ गाण्याचा किस्सा...
छोटीसी ये दुनिया
Follow us on

मुंबई : मैत्री आणि मतभेद ही संवेदनशील विचारांची दोन टोकंच जणू… जमलेली घनिष्ट मैत्री कधी कधी अखंडित राहते, तर कधी मतभिन्नतेच्या छायेनं काळवंडूनही जाते. चित्रपट क्षेत्रात दररोज बदलणारी यश अपयशाची समीकरणं, अस्थिरता, राजकारण आणि व्यवहार याच्यातून टिकून राहिलेली कलाकारांची निखळ मैत्री तशी दुर्लभच.

आर. के. फिल्म्सच्या ‘बरसात’ चित्रपटाच्या निमित्ताने हसरत जयपुरी, शैलेंद्र, शंकर आणि जयकिशन ही तरुण गीतकार, संगीतकार मंडळी पहिल्यांदाच एकत्र आली होती. 25 वर्षांच्या राज कपूर नावाच्या तरुण महत्त्वाकांक्षी निर्माता, अभिनेता दिग्दर्शकानं या चौघांना एकत्र जोडलं. पुढची दोन दशकं या सगळ्यांनी मिळून कसा इतिहास रचला हे सर्वांनीच पाहिलं आहे. या सगळ्यांनी आर. के. फिल्म्स आणि राज कपूर व्यतिरिक्त अन्य चित्रपट आणि दिग्दर्शकांसाठीही लक्षात राहणारी कामं केली. त्याचे दाखले देणारी शेकडो सुरेल गीतं आजही आपण ऐकतो.

या चौकटीच्या एकत्रित कामगिरीचा आणि संगीताचा ‘रंगोली’ हा असाच एक चित्रपट. 1962 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं संगीत त्यांच्या भव्य दिव्य कामगिरीची निशाण आहे.  यातील गाण्यांवर शैलेंद्र-हसरत-शंकर-जयकिशन यांचा ठसा देखील आहे.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत

‘रंगोली’मध्ये ‘छोटीसी ये दुनिया, पहेचाने रास्ते’ हे सुंदर गीत आणि त्याची दोन रूपं होती. ‘रंगोली’चे नायक किशोरकुमार यांच्या आवाजात तसंच नायिका वैजयंतीमाला यांच्यासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात हे गीत स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रित केलं गेलं होतं. शंकर-जयकिशन जोडीची मुद्रा असलेलं व्हायोलिन आणि अॅकार्डियनने सज्ज असा सुंदर वाद्यमेळ या गीतात होता. किशोरदांनी गायलेल्या गीतात कारुण्य होतं पण, त्यात सकारात्मकता होती. तर लताजींनी गायलेल्या दुसऱ्या रुपाला दुःख,विरहाची किनार होती.

गाण्यामुळे झालेले वाद गाण्यानेच दूर झाले!

‘रंगोली’पर्यंत शंकर-जयकिशन, हसरत, शैलेंद्र यांच्या कारकीर्दीच दशक उलटून गेलं होतं. आंतरिक बंध मजबूत होते. पण, कुठेतरी नकारात्मक वादाचे सूर उमटायला सुरुवात झाली होती. या चौघांमध्ये शंकरजी आणि शैलेंद्र आणि जयकिशन आणि हसरत असं ट्युनिंग होतं असं म्हटलं जाई. एकदा कधी तरी एकत्र काम करताना शैलेंद्र आणि जयकिशन यांचे जोरदार मतभेद झाले आणि ते विकोपाला गेले. दोघांमध्ये खूप अबोला सुरू झाला. दोघही मनस्वी आणि कलंदर. हा अबोला फार काळ टिकणार नव्हता आणि तसं ते व्यावहारिकदृष्ट्या चाललंही नसतं. त्या मनस्थितीत शैलेंद्र यांनी ‘छोटीसी ये दुनिया, पेहेचाने रास्ते है, तुम काही तो मिलोगे तो पूछेंगे हाल’ हे शब्द लिहिले, जे अर्थातच त्यांनी जयकिशन यांना उद्देशून लिहिले होते.

दिल कि दौलत मत ठुकरावो देखो पछताओगे

आज चले जाते हो जैसे लौटके भी आओगे

हे शब्द ऐकताच दोघांमधील गैरसमजाच धुकं क्षणात निवळलं. जयकिशन आणि शैलेंद्र पाठोपाठ अकाली मृत्यूने गाठेपर्यंत एकत्र काम करत राहिले.

हेही वाचा :

ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणतेय, ‘मला भाईजान सलमान खानला राखी बांधायचीय, कारण…’

एक अशी कथा जिने समाजातील जातपात भेदभाव करणाऱ्यांना लगावली चपराक! वाचा कसा आहे रिंकूचा ‘200 हल्ला हो’