ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणतेय, ‘मला भाईजान सलमान खानला राखी बांधायचीय, कारण…’

इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) देखील या सणाबद्दल खूप उत्साहि आहे. ‘बिग बॉस’ फेम डान्सर आणि एंटरटेनर राखी सावंत म्हणतेय की, तिला यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी सलमान खानच्या मनगटावर राखी बांधायची आहे. राखी म्हणाली की, सलमान खान (Salman Khan) तिला सक्ख्या भावाप्रमाणे मदत करत आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंत म्हणतेय, ‘मला भाईजान सलमान खानला राखी बांधायचीय, कारण...’
राखी आणि सलमान

मुंबई : यावर्षी 22 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) देखील या सणाबद्दल खूप उत्साहि आहे. ‘बिग बॉस’ फेम डान्सर आणि एंटरटेनर राखी सावंत म्हणतेय की, तिला यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी सलमान खानच्या मनगटावर राखी बांधायची आहे. राखी म्हणाली की, सलमान खान (Salman Khan) तिला सक्ख्या भावाप्रमाणे मदत करत आहे. राखी म्हणते की, सलमान भाईने माझ्या आईच्या उपचाराला मदत केली आणि तिला नवीन जीवन दिले.

राखीने ‘पिंकविला’शी केलेल्या संभाषणात आपली इच्छा व्यक्त केली आहे. ती म्हणते, ‘मला विकास गुप्ताला राखी बांधायची आहे. त्याने माझ्यासाठी खूप काही केले आहे. मी माझा भाऊ राकेश आणि संजय दादा यांनाही मी राखी बांधणार आहे. या सगळ्या व्यतिरिक्त मलाही सलमान भाईला देखील राखी बांधायची आहे. कारण त्याने माझ्या आईला नवीन आयुष्य दिले आहे.

सलमानने केली राखीच्या आईच्या ऑपरेशनसाठी मदत

या वर्षी एप्रिलमध्ये राखी सावंतने सांगितले होते की, तिची आई कॅन्सरची झुंज देत आहे. हा ट्यूमर काढण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. यावेळी सलमान खानने राखीला आर्थिक मदत केली आणि तिच्या आईची शस्त्रक्रिया करून घेतली. राखीने 19 एप्रिल रोजी आईसोबत एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये राखी म्हणाली होती की, ‘आज आईचे ऑपरेशन आहे. डॉक्टर संजय शर्मा आज तिची कॅन्सरची गाठ काढून टाकतील. मी खूप आनंदी आहे की, आता आईला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही.’

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

पुढे व्हिडीओमध्ये राखी सावंतची आई हात जोडून म्हणते की, ‘मी सलमानला सलाम करते. देवाने सलमान खानला माझ्या जीवनात देवदूत म्हणून पाठवले आहे. तो माझ्या पाठीशी उभा राहिला आहे आणि आज माझे ऑपरेशन होत आहे. मी प्रार्थना करते की, त्याचे कुटुंब नेहमी आनंदी आणि सर्व संकटांपासून सुरक्षित राहावे.’

याच व्हिडीओमध्ये राखी पुढील म्हणते की, ‘सलमान जी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज माझ्या आईचा जीव वाचवलात. देवाची कृपा आणि तुमच्यामुळे आज एवढे मोठे ऑपरेशन होत आहे. प्रत्येक घरात सलमान आणि सोहेल सारखा मुलगा असायला पाहिजे.’

‘बिग बॉस ओटीटी’च्या घराबाहेर राखीचा ड्रामा

राखी सावंत दोन दिवसांपूर्वी’ बिग बॉस ओटीटी’च्या घराबाहेर केलेल्या ड्रामामुळे चर्चेत आली होती. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला ‘वीकेंड का वार’ या एपिसोडमध्ये शोमध्ये आले होते. यानंतर राखी थोडी चिडलेली दिसली. तिने सांगितले की, तिला देखील ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातही प्रवेश करायचा आहे. दुसऱ्याच दिवशी राखी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घराबाहेर ‘स्पायडर मॅन’ ड्रेस परिधान करून पोहोचली होती. तिथे तिने बराच ड्रामा केला.

हेही वाचा :

सौदी अरेबिया, कतार आणि कुवैतमध्ये अक्षयच्या ‘बेल बॉटम’वर बंदी! नेमकं कारण काय?

एक अशी कथा जिने समाजातील जातपात भेदभाव करणाऱ्यांना लगावली चपराक! वाचा कसा आहे रिंकूचा ‘200 हल्ला हो’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI