AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bell Bottom Banned | सौदी अरेबिया, कतार आणि कुवैतमध्ये अक्षयच्या ‘बेल बॉटम’वर बंदी! नेमकं कारण काय?

बॉलिवूड अभिनेता अक्षर कुमार (Akshay Kumar) याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बेल बॉटम' (Bell Bottom) 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयसोबत वाणी कपूर (Vani Kapoor), हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि लारा दत्ता (Lara Dutta) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Bell Bottom Banned | सौदी अरेबिया, कतार आणि कुवैतमध्ये अक्षयच्या ‘बेल बॉटम’वर बंदी! नेमकं कारण काय?
बेल बॉटम
| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 2:00 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षर कुमार (Akshay Kumar) याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. अक्षयसोबत वाणी कपूर (Vani Kapoor), हुमा कुरेशी (Huma Qureshi) आणि लारा दत्ता (Lara Dutta) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘बेल बॉटम’ केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांमध्ये रिलीज झाला आहे. परंतु, अक्षयच्या चित्रपटावर सौदी अरेबिया, कुवैत आणि कतारमध्ये बंदी घालण्यात आल्याचे वृत्त येत आहे आणि याचे कारण म्हणजे चित्रपटाती एक सीन जो तेथील सेन्सॉर बोर्डाच्या मते ते दाखवणे योग्य नाही.

सत्य दाखवल्याबद्दल आक्षेप

बॉलिवूड हंगामाच्या मते, चित्रपटाच्या उत्तरार्धात अपहरणकर्त्यांनी लाहोरहून दुबईला विमान नेल्याचे दाखवण्यात आले आहे. वास्तविक अशीच एक घटना 1984 मध्ये घडली आहे. यूएईचे संरक्षण मंत्री शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी वैयक्तिकरित्या ही परिस्थिती हाताळली आणि अपहरणकर्त्यांना यूएईच्या अधिकाऱ्यांनी पकडले.

दुसरीकडे, बेल बॉटममध्ये अक्षय कुमारने साकारलेल्या पात्रासह अनेक भारतीय अधिकारी या प्रकरणातील नायक म्हणून दाखवले गेले. जे यूएईच्या संरक्षणमंत्र्यांना त्यांच्या ऑपरेशनबद्दल अंधारात ठेवतात. कदाचित म्हणूनच सौदी देशांच्या सेन्सॉर बोर्डाने त्यावर आक्षेप घेतला असावा आणि म्हणून त्यावर बंदी घातली गेली आहे.

प्रेक्षकांना आवडला ‘बेलबॉटम’

कोरोना विषाणूच्या काळादरम्यान, हा असा पहिला चित्रपट आहे, जो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. बेल बॉटमसाठी अक्षय कुमारचे सर्व बाजूंनी कौतुक होत आहे. कोरोना काळामध्ये हा पहिलाच चित्रपट आहे, जो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांच्या या निर्णयाचे अनेक बॉलिवूड सेलेब्सनी कौतुक केले आहे.

चित्रपटाला बसणार फटका

भारतातील अनेक राज्यांमध्ये, विशेषत: महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहे बंद असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर बेल बॉटमचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.75 कोटींची कमाई केली होती. आता हा चित्रपट देखील ऑनलाईन लीक झाला आहे. ज्याचा त्याच्या कमाईवरही मोठा परिणाम होईल.

चित्रपटाचा सिक्वेल येण्याची शक्यता

अलीकडेच, अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’च्या सिक्वेल येण्याचे संकेतही दिले आहेत. अभिनेता म्हणतो- ‘ज्या प्रकारे चित्रपट संपतो, तिथे सिक्वेलला वाव आहे. जर मेकर्स चांगली स्क्रिप्ट घेऊन आले, तर काम करता येईल.’ अशा परिस्थितीत आता अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अक्षय सध्या लंडनमध्येच!

अक्षय कुमार सध्या लंडनमध्ये आहे. तो तिच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्री रकुलप्रीत सिंहदेखील त्याच्यासोबत या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अक्षय कुमार ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’, ‘अतरंगी रे’ आणि ‘सूर्यवंशी’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही वाचा :

अभिनेता रणदीप हुडा मोठ्या अडचणीत, पटकथा लेखिकेने भरपाई म्हणून मागितले 10 कोटी! वाचा नेमकं काय झालं…

एक लडकी को देखा तो ऐसा लगा…, अभिनेत्री अभिनेत्री सुरभी चंदनाचा सोशल मीडियावर जलवा

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.