AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार लोकांपासून सावधान, पाठीत खंजीर खुपसतात, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य म्हणतात समजात सर्व लोक सारखीच नसतात, काही लोक ही अतिशय चांगल्या स्वभावाची असतात, तर काही लोक हे धूर्त आणि कपटी असतात अशा लोकांपासून आपल्याला आपला बचाव करता आला पाहिजे.

Chanakya Niti : या चार लोकांपासून सावधान, पाठीत खंजीर खुपसतात, चाणक्य काय सांगतात?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 8:55 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य या ग्रंथामध्ये म्हणतात की या जगात जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या प्रवृत्ती देखील असतात. काही लोक हे स्वभावाने खूप चांगले असतात. ते आपल्याबद्दल नेहमी चांगलाच विचार करतात. मात्र काही लोक हे मुळातच धूर्त आणि कपटी असतात. असे लोक आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे असे लोक तुम्हाला वेळीच ओळखता आले पाहिजेत, जर अशा लोकांसोबत तुम्ही मैत्री केली तर भविष्यात त्याचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. असे लोक आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, तसेच हे लोक कसे ओळखायचे यासाठी देखील चाणक्य यांनी अशा लोकांची काही लक्षणं सांगितली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक तुमच्या आसपास सर्वत्र आढळून येतात, यामध्ये मग कोणी तुमचे मित्र असतील, कोणी तुमचे नातेवाईक सुद्ध असू शकतात. जोपर्यंत या लोकांना तुमच्यापासून फायदा दिसतोय, तोपर्यंतच हे लोक तुमच्यासोबत असतात. जर या लोकांना वाटलं की आता तुमच्यापासून फायदा नाही, तेव्हा असे लोक पुन्हा तुमच्याकडे फिरकणार सु्द्धा नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात असे लोक तर सर्वात जास्त धोकादायक असतात. या लोकांच्या मनात कायम कपटाची भावना असतो. असे लोक तुम्हाला कुठेही संकटात आणू शकतात. त्यामुळे असे लोक वेळीच ओळखावेत आणि त्यांच्यापासून लांब राहावं, त्यातच आपलं हीत आहे.

तुमच्यावर जळणारे लोक – चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात ज्यांना तुमची प्रगती सहन होत नाही, ते लोक तुमचा मत्सर करतात. तुम्हाला मागं खेचण्यासाठी प्रयत्न करतात. अशा लोकांपासून नेहमी सावध रहावं, तसेच अशा लोकांना तुमच्या कोणत्याही गुप्त योजना सांगू नयेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप