AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला धमकी देऊन माझ्या डिसिजनमध्ये …, ‘ तुकाराम मुंढे यांचा व्हिडीओ का होतोय व्हायरल

तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. एफडीएचे कमिशनर झाल्यापासून त्यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याचाच नव्हे तर थेट जीवनाशीच संबंध असलेला अन्नभेसळीचा विषय हाती घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

'मला धमकी देऊन माझ्या डिसिजनमध्ये ..., ' तुकाराम मुंढे यांचा व्हिडीओ का होतोय व्हायरल
tukaram mundhe news
| Updated on: Aug 18, 2026 | 10:55 PM
Share

तुकाराम मुंढे म्हणजे बस नामही काफी है. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे यांची या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी या खात्याला इतके काम असते हे लोकांना माहिती नव्हते. किंवा अन्न भेसळ तर होणारच त्याला कसे रोखणार असा लोकांचा समज होता. आता या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्याला काम करायचे असते तो अशा पदावनतीत ही संधी शोधतोच, तसा मुंढे यांनी कामाचा धडाका लावला आहे. त्यामुळे आजच्या भ्रष्ट व्यवस्थेत कोणीतरी इमानदार बंदा निघावा आणि भ्रष्टाचाराच्या वाळवंटात ओएसिस सापडावे अशी लोकांची अतृप्त इच्छा त्यांच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे, असेच म्हटले तर वावगे ठरणार नाही. या तुकाराम मुंढे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आयएएस तुकाराम मुंढे यांचे समाजमाध्यमावर शेकडो व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यात त्यांच्या कामगिरीचे सामान्य जनतेला असलेले कौतूकाचे व्हिडीओ ढीगाने व्हायरल होत आहेत. त्यातच एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओ तुकाराम मुंढे प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला धमकीचे पत्र आल्याचे सांगताना दिसत आहेत. या व्हिडीओत आपल्याला आलेले हे चौथे पत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धमकी देऊन कोणी माझ्या डिसिजनमध्ये बदल करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो कधीच यशस्वी होणार नाही असे या मुलाखतीत तुकाराम मुंढे म्हणताना दिसत आहेत.

जुना व्हिडीओ व्हायरल

आपल्यात जर काही त्रुटी असेल जर ती खरोखरच दुरुस्त करण्यासारखी असेल तर मी त्याचे स्वागत करतो. मात्र, त्यात काही तथ्य नसेल तर आपण फिकीर करत नाही. त्यामुळे आपल्या कुटुंबाला आणि मला पुरेशी सुरक्षा आहे. मी धमकी देणाऱ्यांची कधी पर्वा केलेली नाही. मला रात्रीच्या सुरक्षेची काही गरज नाही. माझ्या सोबत शस्रधारी सुरक्षा रक्षक असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. हा व्हिडीओ ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे ( पीएमपीएल ) व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांना आलेल्या धमकीचा आहे. मुंढे यांना एकाच आठवड्यात दोनदा जीवे मारण्याची धमकी त्यावेळी आली होती. तेव्हा त्यांनी आपल्याला धमकी देणाऱ्यांनी आपला बायोडेटा पाहावा असेही म्हटले होते.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर