पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आली, दरवाजा उघडला आणि… काय घडलं त्या तरुणीसोबत?
एका पिझ्झा डिलिव्हरी एजंटला ग्राहकाने अनपेक्षितपणे मोठी टीप दिली. आईच्या निधनाने दुःखात असलेल्या त्या तरुणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेराबद्ध झाला असून तो माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे. डिलिव्हरी एजंटसोबत आदराने वागण्याचे महत्त्व यातून दिसून येते, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी संघर्ष सुरू असतो.

घराच्या गेटवर पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी दरवाजात आलेल्या एजंटांना अनेकदा पिझ्झा घेणाऱ्यांसमोर हतबल व्हावे लागते. या डिलिव्हरी एजंटशी लोक अत्यंत वाईट पद्धतीने बोलतात. त्यांच्याशी वाईट पद्धतीने वागतात. त्यांना नोकरासारखं वागवतात. त्यामुळे या एजंटांना आपलं प्रोफेशन अत्यंत छोटं वाटतं आणि त्यांना नैराश्य येतं. पण काही लोक एजंटांची मजबुरी समजतात. त्यामुळे डिलिव्हरी एजंट आल्यावर त्यांच्याशी माणुसकीने वागतात. त्यांना पाणी वगैरे विचारतात. अमेरिकेत एका व्यक्तीने असंच काही केलंय. त्यामुळे पिझ्झाची डिलिव्हरी करायला आलेल्या मुलीचा दिवसच झक्कास गेला.
ओस्मानेक स्मिथ (Osmanek Smith) नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ बनवला असून त्याने त्याच्याबाबत घडलेला प्रसंग या व्हिडीओत दाखवला आहे. या व्हिडीओत पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आलेली तरुणी घराच्या गेटवर दिसत आहे. ती हसताना दिसत आहे. आल्यावर ती ग्राहकाला पिझ्झा देते. सोबतच ती त्याच्या चष्म्याचंही कौतुक करताना दिसत आहे.
पेमेंट देण्याच्यावेळी
पिझ्झा दिल्यानंतर पेमेंट द्यायची वेळ येते तेव्हा या तरुणीला आश्चर्याचा धक्काच बसतो. स्मिथ तिला पेमेंट देण्याऐवजी भरपूर नोटा देतात. इतक्या नोटा दिल्यानंतर या नोटा कमी वाटतात का? असं स्मिथ तिला विचारतात. त्यानंतर पुन्हा काही नोटा तिच्या हातावर टेकवतात. स्मिथ यांना या तरुणीला मदत करायची होती. त्यासाठीच ते तिला भरमसाठ नोटा देताना दिसत आहेत.
पण त्यानंतर ही तरुणी अचानक रडताना दिसत आहे. आपल्याला मदत म्हणून या नोटा दिल्या जात असल्याचं तिच्या लक्षात आल्यावर तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ढासळायला लागले. ती ढसाढसा रडायला लागली. रडत असतानाच आपल्या आईचं नुकतच निधन झाल्याचं तिने त्याला सांगितलं. तुम्ही मला इतक्या नोटा का दिल्या? असा सवालही ती रडत रडतच विचारते. त्यावर स्मिथ म्हणतो, मी असंच करतो. या तरुणीचं नाव टेलर आहे. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तसेच कॅप्शनमध्ये तिला भरभरून आशीर्वादही दिले आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनाही गलबलून आलंय. त्यांनीही स्मिथ आणि टेलर यांना भरभरून दुआ दिली आहे. प्रेम हेच सर्व रोगांवरचं औषध आहे, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. दुसऱ्याने तर कोण कोणत्या अडचणीत असेल हे सांगता येत नाही, असं म्हटलं आहे. एका यूजर्सने तर त्याचा किस्साच शेअर केला आहे. डिलिव्हरी एजंटला प्रत्येकवेळी टीप दिल्यावर तो कसा खूश होत असतो, याचा किस्सा त्याने शेअर केला आहे.
