AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : रिचार्ज महागला तरी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत, जिओच्या मोठ्या घोषणेने थेट 52 कोटी लोकांना फायदा

Jio Prime : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी 300 रुपयांची मेंबरशिप आणत आहे. ही मेंबरशिप एका वर्षासाठी वैध असेल. याचे फायदे जाणून घेऊयात.

Jio : रिचार्ज महागला तरी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नाहीत, जिओच्या मोठ्या घोषणेने थेट 52 कोटी लोकांना फायदा
Jio Prime Membership PlanImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 17, 2026 | 11:51 PM
Share

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने जिओ प्राइम ग्राहकांना एका वर्षासाठी रिचार्जच्या किमतीची हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कंपनी 300 रुपयांची मेंबरशिप आणत आहे. ही मेंबरशिप एका वर्षासाठी वैध असेल. ही मेंबरशिप घेतल्यानंतर ग्राहकांना पुढील एक वर्ष सध्याच्या किमतीतच रिचार्ज करता येणार आहे. म्हणजेच भविष्यात रिचार्जच्या किमती वाढल्या तरी जिओ प्राइम सदस्यांसाठी त्यांच्या सध्याच्या प्लॅनची किंमत बदलणार नाही. तसेच कंपनीचा 299 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सुरूच राहणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. याचा फायदा कोट्यवधी ग्राहकांना होणार आहे.

जिओ प्राइम 20 ऑगस्टपासून उपलब्ध होणार

जिओची जिओ प्राइम मेंबरशिप 20 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. ग्राहक MyJio अॅप, Jio.com, जिओ स्टोअर्स किंवा अधिकृत जिओ पार्टनर स्टोअर्समधून मेंबरशिप खरेदी करू शकणार आहेत. सध्याच्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसोबतच नवीन जिओ ग्राहकांसाठीही जिओ प्राइम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इतर नेटवर्कचे ग्राहक आपला नंबर पोर्ट करून या सुविधेत सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे, 300 रुपयांची एकरकमी मेंबरशिप घेऊन ग्राहक आपल्या सध्याच्या जिओ प्लॅनची आजची किंमत 5 सप्टेंबर 2027 पर्यंत लॉक करू शकणार आहेत.

इतर प्लॅनवरही करता येणार रिचार्ज

जिओने दिलेल्या माहितीनुसार, जिओ प्राइमचे वैशिष्ट्ये म्हणजे ग्राहकांना एका विशिष्ट प्लॅनपुरते मर्यादित राहावे लागणार नाही. ग्राहकांना हवे असल्यास इतर जिओ प्लॅनवरही रिचार्ज करता येईल आणि तरीही जिओ प्राइमच्या सुविधांचा लाभ घेता येईल.

एअरटेलने हटवला, मात्र जिओचा 299 रुपयांचा प्लॅन सुरूच राहणार

टेलिकॉम बाजारात रिचार्जच्या किमती महागण्याची चर्चा असताना आता जिओने जिओ प्राइमची घोषणा केली आहे. एअरटेलने नुकताच आपल्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये बदल करत 299 रुपयांसह काही लोकप्रिय प्लॅन बंद केले आहेत. त्यानंतर 28 दिवसांच्या डेली-डेटा श्रेणीमध्ये 349 रुपयांचा प्लॅन हा सुरुवातीचा पर्याय ठरला आहे. मात्र जिओने स्पष्ट केले आहे की त्यांचा सध्याचा 299 रुपयांचा प्लॅन सुरूच राहणार आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या...
अखेरचा कॉले केला तो देखील... नाना पाटेकरांच्या 'नाम फाऊंडेशन'च्या पदाधिकाऱ्याने दिली मोठी माहिती
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...