AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SA : न्यूझीलंडकडून 176 धावांचं आव्हान, दक्षिण आफ्रिकेचं जिंकणं अवघड, आकडे काय सांगतात?

New Zealand vs South Africa : दक्षिण आफ्रिकेला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी हॅट्रिक करायची असेल तर न्यूझीलंड विरुद्ध 8.80 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

NZ vs SA : न्यूझीलंडकडून 176 धावांचं आव्हान, दक्षिण आफ्रिकेचं जिंकणं अवघड, आकडे काय सांगतात?
Quinton De Kock NZ vs SAImage Credit source: blackcaps x account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 14, 2026 | 9:34 PM
Share

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 24 व्या सामन्यात न्यूझीलंड क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 8.75 च्या रन रेटने एकूण 175 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी एकूण 6 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र एकालाही त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलता आलं नाही. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी केली. मात्र त्यानंतरही त्यांना दक्षिण आफ्रिकेसमोर 200 धावांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका हे विजयी आव्हान पूर्ण करुन सलग तिसरा सामना जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील हा तिसरा सामना आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ तिसरा विजय मिळवण्यासाठी उत्सूक आहेत. मात्र कोणत्या एकाच संघाचं सलग तिसरा सामना जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तसेच न्यूझीलंडला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदाही विजय मिळवता आलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 11 पैकी फक्त 2 वेळाच 150 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयी हॅट्रिक करायची असेल तर न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येक ओव्हरमध्ये 8.80 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.

पहिल्या डावात काय झालं?

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडला सलामी जोडीने ठिकठाक सुरुवात करुन दिली. टीम सायफर्ट आणि फिन एलन या दोघांनी 33 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड टीमला ठराविक आणि त्यानंतर झटपट असे 4 झटके दिले.

ठिकठाक सुरुवात मग घसरगुंडी

टीम सायफर्ट आणि रचीन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. एलन याने 31 धावांचं योगदान दिलं. ग्लेन फिलिप्स 1 धाव करुन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर मार्क चॅपमॅन आणि डॅरेल मिचेल या जोडीने निर्णायक भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 44 बॉलमध्ये 74 रन्सची पार्टनरशीप केली.

चॅपमॅन याने 48 आणि डॅरेलने 32 धावा केल्या. कॅप्टन मिचेल सँटनर 4 धावा करुन मैदानाबाहेर गेला. जेम्स निशाम आणि मॅट हॅन्री या दोघांनी आठव्या विकेटसाठी 20 बॉलमध्ये 30 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. निशामने 23 आणि 9 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को यान्सेन याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर लुंगी एन्गिडी, केशव महाराज आणि कॉर्बिन बॉश या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...