AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपला धक्का बसणार, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सपा 300 हून जागा जिंकणार, कुणी केली भविष्यवाणी?

भाजपला धक्का बसणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सपा 300 हून जागा जिंकणार असल्यचा दावा एका खासदाराने केल आहे.

भाजपला धक्का बसणार, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सपा 300 हून जागा जिंकणार, कुणी केली भविष्यवाणी?
bjp flag newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 2:43 PM
Share

उत्तर प्रदेशात थंडीच्या दिवसांत राजकारण तापलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी अयोध्याचे खासदार , समाजवादी पक्षाचे नेते अवधेश प्रसाद यांनी मोठा दावा केला आहे. खासदार अवधेश प्रसाद यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला 300 हून अधिक जागा मिळतील, असा दावा केला आहे.

खासदार अवधेश प्रसाद यांनी म्हटलं की, योगी आदित्यनाथ  यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेशच्या सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे.  लोकांचा आता भाजपवर विश्वास राहिलेला नाही. समाजवादी पक्ष ऐतिहासिक विजयासहित 300 हून अधिक जागा जिंकेल. उत्तर प्रदेशात 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकी लोकांनी भाजपला झटका दिला. त्यानंतर आता 2027 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप नागरिकांना झटका देणार आहे.  समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांची जामिनावर सुटका झाली आहे. याचा परिणाम हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अवधेश प्रसाद यांनी म्हटलं की, आजम खान यांना जामीन मिळालाय,  या निर्णयाचं स्वागत करतो. 2027 साली होणारी निवडणूक जवळ आली आहे. यंदा उत्तर प्रदेशातील मतदारांनी अखिलेश यादव यांच्यावर विश्वास ठेवला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे भाजपचा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा मानस आहे. तर समाजवादी पक्ष सत्तेत पुन्हा कमबॅक करण्याचा विचारात आहे.  भाजपने 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.  उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी भाजपने एकट्याने 255 जागांवर बाजी मारली होती. तर मित्रपक्ष अपना दलाने 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या होत्या. मागच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील युतीने 273 जागा जिंकल्या होत्या.  तर समाजवादी पक्षाने 111 जागा जिंकून दुसरा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. तर मित्रपक्ष राष्ट्रीय लोक दलाने 8, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाने 6 जागा जिंकल्या होत्या.  समाजवादी पार्टी प्रणीत युतीने एकूण 125 जागा जिंकल्या होत्या.

Follow Us
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा