AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का; ऑपरेशन टायगरपूर्वीच भाजपाचं ऑपरेशन लोटस, मोठा पक्षप्रवेश

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच आता एकनाथ शिंदे यांना भाजपाने मोठा धक्का दिला आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा धक्का; ऑपरेशन टायगरपूर्वीच भाजपाचं ऑपरेशन लोटस, मोठा पक्षप्रवेश
शिवसेना शिंदे गटाला धक्काImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 1:54 PM
Share

काही दिवसांपूर्वी एक पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं होतं. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो सोबतच वेट अँड वॉच 3.0 असा मजकूर देखील होता. या व्हायरल पोस्टरनंतर शिवसेना शिंदे गट पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र ही चर्चा सुरू असतानाच आता भाजपनं एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे.

क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण हे आज  पालघरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी श्रीनिवास वनगा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पालघर जिल्ह्यात हा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.  2024 पासूनच श्रीनिवास वनगा हे शिवसेना शिंदे गटावर नाराज होते, त्यानंतर त्यांनी आता धनुष्यबाण सोडून आपल्या हाती कमळ घेतलं आहे. या पक्षप्रवेशाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

श्रीनिवास वनगा काय म्हणाले? 

काही वर्षांपूर्वीच्या राजकीय घडामोडींमुळे आपण भरकटलो होतो, मात्र कार्यकर्ते आणि परिवाराची इच्छा स्वगृही परतण्याची होती, असे सांगत श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये पुनरागमन केले. माजी खासदार चिंतामण वनगा आज हयात असते तर आपल्या या निर्णयाने आनंदी झाले असते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. कोणत्याही पदाची किंवा अपेक्षेची इच्छा नसून सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या कामाचे कौतुक करत भाजपच्या माध्यमातून विकास कामांना गती मिळेल, असा विश्वासही यावेळी श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केला. दरम्यान पालघरमध्ये हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा झटका मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपाला आणखी बळ मिळणार आहे.

Follow Us
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा