AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातच तोडणार… भारताला धमकावणारा पाकिस्तानचा मंत्री दिल्लीत येतोय, सरकारकडूनच निमंत्रण

वादग्रस्त पाकिस्तानी मंत्री मुसादिक मलिक भारताच्या निमंत्रणावरून दिल्लीत SCO परिषदेसाठी येत आहेत. सिंधू जल करारावरून भारताला धमकी देणाऱ्या मलिक यांच्या भेटीमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दहशतवादाचा मुद्दा कायम असतानाही मुत्सद्देगिरीतून संवाद साधण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा आहे.

हातच तोडणार... भारताला धमकावणारा पाकिस्तानचा मंत्री दिल्लीत येतोय, सरकारकडूनच निमंत्रण
Musadik Malik Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 1:49 PM
Share

पाकिस्तानचा वादग्रस्त मंत्री मुसादिक मलिक भारतात येत आहे. मुसादिक मलिक हे पाकिस्तानचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी भारताला धमकावलं आहे. सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर त्यांनी भारताला हात तोडण्याची धमकी दिली होती. आता त्यांच्यासाठीच केंद्र सरकारने पायघड्या टाकल्या आहेत. भारताच्या निमंत्रणावरून ते दिल्लीत येणार आहेत. 20 ते 22 डिसेंबर दरम्यान SCO म्हणजे शंघाई सहयोग संघटनेच्या बैठकीत सामील होण्यासाठी ते येणार आहेत.

मुसादिक मलिक यांच्या आधी बिलावल भुट्टो 2023 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. परराष्ट्र मंत्री म्हणून भुट्टो यांनी SCOच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेतला होता. भारताच्या अध्यक्षतेखाली ही परिषद गोव्यात पार पडली होती. त्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा एखादा मंत्री भारतात येत आहे. फेब्रुवारी 2019मध्ये पुलवामा आणि त्यानंतर 2025मध्ये पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध बिघडले होते.

तणाव वाढणारं विधान

सिंधू जल संधी कराराच्या अनुषंगाने मुसादिक मलिक यांनी भारताला इशारा दिला होता. जो कोणी आमच्या पाण्याला हात लावेल, त्याचे हात तोडले जाईल, याची घोषणा आधीच करण्यात आलेली आहे, असा इशारा मलिक यांनी दिला होता. भारताने पुलावामा हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले होते. त्यात सिंधू जल संधी करार स्थगित करण्याचा मोठा निर्णय होता.

भारतानेच दिलं आमंत्रण

मलिक एससीओ सिव्हिलायजेशन डायलॉगसाठी येत असलेल्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्त्व करत आहेत. त्याआधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी भारताने SCO च्या सर्व सदस्यांना निमंत्रण दिल्याचं सांगितलं होतं. त्यात भारत, चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, इराण, उज्बेकिस्तान, पाकिस्तान आणि बेलारुसच्या मंत्र्यांचा समावेश आहे. या परिषदेवर पाकिस्तानकडूनही प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तान सरकार SCOच्या अंतर्गत एकमेकांचा सन्मान आणि संवाद तसेच लोकांच्या एकमेकांशी कनेक्ट होण्यावर भर देत असून आम्ही त्यासाठी समर्पित आहोत, असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

भारताने काय म्हटलंय?

दुसरीकडे पाकिस्तानकडून भारताशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, भारताने अनेक वेळा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जोपर्यंत दहशतवाद संपुष्टात येत नाही. तोपर्यंत पाकिस्तान सोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं भारताने म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रातही भारत पाकिस्तानला सातत्याने घेरत आला आहे.

Follow Us
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता