बिअर पिल्याने थेट शरीराच्या या भागावर होतो सर्वाधिक परिणाम, नव्या संशोधनातून मोठी माहिती पुढे, थेट..
बरेच लोक जास्त प्रमाणात दारू पितात. सतत दारू पिल्याने आरोग्यावर घातक परिणाम होतो. नुकताच एका संशोधनातून मोठी माहिती पुढे आली. बिअर पिल्याने नक्की काय होते, हे संशोधनातून पुढे आले.

बरेच लोक मोठ्या प्रमाणात दारू पितात. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत हे लोक दारू पितात. मात्र, बिअर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. अनेकांना वाटते की, बिअर प्यायल्याने किडनीला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. मात्र, तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. अलीकडील अभ्यासानुसार, बिअरच्या सेवनाचा परिणाम फक्त यकृतापुरता मर्यादित नसून तो किडनीवर होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक बिअर आणि व्हिस्की, रम शिवाय व्होडका याचे सेवन करतात, त्यांच्या किडनीला इजा होण्याचा धोका हा अधिक असतो. बिअर असो वा कोणतीही दारून धोका हा कायमच असतो. हे संशोधन युनायटेड किंगडममधील अँगलिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. हा अभ्यास सायंटिफिक रिपोर्ट्स’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. ज्यात मोठी गोष्ट पुढे आली.
या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी यूके बायोबँकमधील मद्यपान करणाऱ्या 2,50,791 व्यक्तींच्या आरोग्याचा डेटा घेतला. त्याचे विश्लेषण केले. या व्यक्तींमध्ये सरासरी 14 वर्षांपर्यंत निरीक्षण करण्यात आले. यादरम्यान 10, 335 लोकांवर परिणाम दिसून आला. 9 युनिट्स मद्य प्यायल्याने, एक युनिट मद्य प्यायल्याच्या तुलनेत किडनीवर होणारा परिणाम एका युनिटने कमी असतो.
यामधून हे स्पष्ट झाले की, जे लोक अधिक बिअर पितात, त्यांच्या किडनीवर याचा थेटपणे परिणाम दिसून येतो. बिअर पिल्याने अधिक धोका किडनीला होतो. आपण कायम ऐकतो की, दारू पिल्याने त्याचा किडन्या निकामी झाल्या. बिअर सतत पिल्याने त्याचा गंभीर परिणाम किडनीवर होत असल्याचे या संशोधनात स्पष्ट झाले.
किडनी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. किडनीचे काम रक्तातून घाण काढणे आणि जास्त पाण्याला लघवीच्या माध्यमातून आपल्या शरीरातून काढणे आहे. त्याचे कारण म्हणजे जास्त पाणी पिल्याने लघवी अधिक होते. रिपोर्टनुसार, जास्त बिअर पिल्याने शरीर सुजते. जे आपल्या किडनीसाठी अत्यंत धोकादायक आहे. AKI मध्ये किडनी अचानक काम करणे बंद करते. याची प्रमुख लक्षणे लघवी कमी होणे, उल्टा होणे, थकवा यासारखी लक्षणे दिसून येतात.
