जगावर नवं संकट, या मुस्लिम देशावर हल्ल्याचा धोका, तातडीने अलर्ट जारी; मोठी खळबळ
सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये हुती बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे नवं संकट निर्माण झालं आहे. अरामको टॉवरला नुकसान पोहोचल्यानंतर तातडीने अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. यमनमधील हुती सातत्याने सौदीच्या लक्ष्यांवर हल्ले करत आहेत, यामुळे जागतिक स्तरावर तणाव वाढला आहे. ही घटना मध्यपूर्वेतील संघर्षाची तीव्रता दर्शवते.

जगावर नवं संकट घोंघावत आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये हुती बंडखोरांच्या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. राजधानीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सौदी सिव्हिल डिफेन्सने संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने अलर्ट जारी केला आहे. सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी राजधानी रियादच्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत होती. त्यापूर्वी म्हणजे एक दिवस आधी रविवारी हूती बंडखोरांनी थेट हल्ला केला होता. या हल्ल्यात अरामको टॉवरचं मोठं नुकसान झालं होतं. या नव्या संकटामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
रविवारी झालेल्या हल्ल्या दरम्यान मिसाइल वा ड्रोन रोखण्याच्या प्रयत्नात त्याचा ढिगारा रियादचा अरामको टॉवरवर पडला. त्यामुळे या इमारतीच्या अनेक मजल्यावरील खिडक्या तुटल्या आहेत. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही दुसऱ्या दिवशी सोमवारी रियादमधील जनजीवन सामान्य होतं. रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू होती. मात्र, सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. सर्व यंत्रणांना संभावित धोक्याबाबत अलर्ट करण्यात आलं आहे.
कोणतीही जीवित हानी नाही
सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याने झालेलं नुकसान मर्यादित आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, असं ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तर, आम्ही हूतींच्या मिसाईल हवेतच रोखल्या आहेत. या कारवाईनंतर मिसाईलचा ढिगारा खाली कोसळला. अरामको टॉवरवर हा ढिगारा कोसळला. त्यामुळे इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, या घटनेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, असं सौदीच्या सैन्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
ड्रोनचे हल्ले
दरम्यान, यमनच्या हूती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. गेल्या काही काळापासून हूतीने सौदी अरेबियाविरुद्ध रण माजवलं आहे. मिसाईल आणि ड्रोनचे हल्ले वाढवले आहेत. हूतींच्या टार्गेटवर सौदीचं विमानतळ, बेट आणि तेलाची ठिकाणे आहेत. हूतीकडून सातत्याने हल्ले होत असल्याने सौदीच्या सुरक्षा व्यवस्थेवर दबाव वाढला आहे. अरामको टॉवरवरील हल्लाही याच तणावाच्या दरम्यान झाल्याने यंत्रणा हादरून गेली आहे.
जगाचं टेन्शन वाढलं
सौदी अरेबिया आणि हूती बंडखोरांमद्ये जुलैमध्ये पुन्हा संघर्ष झाला होता. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धातच हा एक संघर्ष समोर आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. फेब्रुवारीत इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केल होते. त्यातच आता हूतीने सौदी अरेबियाला टार्गेट केल्याने जगाचं टेन्शन वाढलं आहे.
