India Oil Import : आंतरराष्ट्रीय बाजारात भारताला तेल विकण्याची रेस, UAE ला मागे टाकून हा देश बनला नंबर 2
India Oil Import : भारत कच्चा तेलाच्या विश्वातील जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. आता स्थिती अशी आहे की, भारताला कच्चं तेल विकण्यासाठी एक प्रकारची शर्यत सुरु झाली आहे.

कच्च तेलं हे भारतासाठी खूप महत्वाचं आहे. कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या तरी भारतावर परिणाम होतो किंवा त्याच्या पुरवठ्यात बाधा आली तरी धाकधूक वाढते. लोकसंख्येचा विचार करता आपण कच्चा तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत. भारत कच्चा तेलाच्या विश्वातील जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे. आता स्थिती अशी आहे की, भारताला कच्चं तेल विकण्यासाठी एक प्रकारची शर्यत सुरु झाली आहे. ऑक्टोंबर महिन्यात भारताने संयुक्त अरब अमीरातपेक्षा सौदी अरेबियाकडून जास्त तेल आयात केली. इराण युद्धानंतर पहिल्यांदा असं घडलय. सौदी अरेबियाला आपला मार्केट शेअर हवा होता. म्हणून त्यांनी सवलतीच्या दरात तेल विक्रीचा प्रस्ताव दिला होता. आकड्यांनुसार, ऑक्टोंबर महिन्यात भारताने रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी केली. त्यानंतर सौदी अरेबिया आणि यूएईचा नंबर येतो.
सौदी अरेबियाकडून आयात वाढून जवळपास 790,000 बॅरल प्रति दिन झालं आहे. मागच्या आठ महिन्यातील ही सर्वाधिक तेल आयात आहे. यूएईकडून तेल खरेदी कमी होऊन 612,000 bpd झाली आहे. मागच्या सात महिन्यातील हा सर्वात खालचा स्तर आहे. सौदी अरेबियाने तेल उत्पादन वाढवलं असून लाल सागरातील यानबू बंदरातून निर्यात वाढवली आहे. सौदी अरेबियाने तेल खरेदीत भारताला सवलत दिली आहे.
भारताने त्यांच्याकडून तेल खरेदी वाढवली
आकड्यांनुसार ऑक्टोंबर महिन्यात भारताचा एकूण तेल आयातीचा रेकॉर्ड 5.58 मिलियन बॅरल प्रतिदिन झाला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत 4.7 टक्के जास्त आहे. सप्टेंबरच्या तुलनेत रशियाकडून तेल आयात 3.5 टक्क्यांनी वाढून 1.85 मिलियन bpd झाली आहे. भारताच्या एकूण खरेदीचा जवळपास एक तृतीयांश भाग आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस इराण युद्धाला सुरुवात झाली. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केला. त्यावेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली. एप्रिल नंतर UAE कडून होणाऱ्या तेल आयातीत सुधारणा झाली आहे. यूएई OPEC मधून बाहेर पडल्यानंतर भारताने त्यांच्याकडून तेल खरेदी वाढवली आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही तेलावर अवलंबून आहे. तेल जागतिक राजकारणातील सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे.
