AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती, मोठी खळबळ

काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथून एक धक्कादायक घटना समोर आली होती. प्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज उर्फ दौलत महाराज सातपुते यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती, मोठी खळबळ
Chaitanya MaharajImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 2:37 PM
Share

काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथून एक धक्कादायक घटना समोर आली होती. प्रसिद्ध किर्तनकार चैतन्य महाराज उर्फ दौलत महाराज सातपुते यांचा मृतदेह त्यांच्याच निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता. महाराजांच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. 14 नोव्हेंबरच्या रात्री महाराज किर्तनावरून निवासस्थानी परतले होते. मात्र त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.  या प्रकरणात घातपाताचा देखील संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र आता या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

जालन्याच्या भोकरदन तालुक्यातल्या अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर मंदिराचे मठाधिपती चैतन्य महाराज उर्फ दौलत महाराज सातपुते यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराजांचा मृत्यू घातपातामुळे नव्हे, तर त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. शवविच्छेदन अहवालानुसारही घातपाताची शक्यता नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येच्या वेळी महाराजांनी खोलीला आतून कडी लावली होती, असे प्रत्यक्षदर्शींचे जबाब असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान,महाराजांचा मोबाईल विहिरीत सापडल्याने या प्रकरणातील गूढ अधिक वाढलं होतं.आता या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच CDR तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. महाराजांच्या संपर्कात कोण होते? मृत्यूपूर्वी त्यांचे कोणाशी बोलणे झाले होते? याचा तपास केला जाणार आहे. आत्महत्या झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष असला, तरी महाराजांनी हे टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण शोधण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.

घटनेनं खळबळ 

समोर आलेल्या माहितीनुसार 14 नोव्हेंबरच्या रात्री महाराज किर्तनावरून निवासस्थानी परतले होते. मात्र त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यामागे काही घातपात आहे का? असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या पाठीमागे कुठलाही घातपात नसून महाराजांनी आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

Follow Us
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा