पाकिस्तानी गायक उमर नदीम याने केलेल्या गंभीर आरोपानंतर सोनू निगम याचा मोठा खुलासा, थेट चोरीचा आरोप आणि

| Updated on: Dec 14, 2023 | 4:40 PM

गायक सोनू निगम हा कायमच चर्चेत असतो. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर झाली. ज्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले. थेट सोनू निगम याच्यावर गंभीर आरोप केले. ज्यानंतर चाहते देखील हैराण झाल्याचे बघायला मिळाले. आता नुकताच या प्रकरणात सोनू निगम याने मोठा खुलासा केला आहे.

पाकिस्तानी गायक उमर नदीम याने केलेल्या गंभीर आरोपानंतर सोनू निगम याचा मोठा खुलासा, थेट चोरीचा आरोप आणि
Follow us on

मुंबई : सोनू निगम हा कायमच चर्चेत राहणारा अभिनेता आहे. नुकताच सोनू निगम याच्यावर अत्यंत गंभीर आरोप झाले. इतकेच नाही तर थेट गाणे चोरल्याचा आरोप सोनू निगम याच्यावर करण्यात आला. यानंतर सर्वजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळाले. हैराण करणारे म्हणजे सोनू निगम याच्यावर हे आरोप पाकिस्तानी गायक उमर नदीम याने केले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उमर नदीम याने आरोप केले. ज्यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. अनेकांनी उमर नदीम याने खोटे आरोप केल्याचे देखील म्हटले.

अखेर या सर्व प्रकरणावर गायक सोनू निगम याने माैन सोडल्याचे बघायला मिळतंय. सोनू निगम याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट सोनू निगम याने इंस्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टमध्ये सोनू निगम हा मोठा खुलासा करताना दिसतोय. इतकेच नाही तर या पोस्टमध्ये सोनू निगम हा माफी मागताना देखील दिसत आहे.

सोनू निगम हा म्हणाला की, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की, यासोबत माझा काहीच संबंध नाहीये. मुळात म्हणजे दुबईतील माझे शेजारी KRK (कमल आर खान) यांनी मला हे गाणे गाण्याची विनंती केली होती. ते माझे शेजारी असल्याने मी यासाठी त्यांना नकार देऊच शकलो नाही. असे नाही की, मी प्रत्येकासाठीच गातो.

मुळात म्हणजे जर मी उमर नदीम याचे गाणे ऐकले असते तर मी अजिबातच हे गाणे गायले नसते. विशेष म्हणजे चक्क सोनू निगम याच्या या पोस्टनंतर उमर नदीम याने म्हटले की, मी सहमत नक्कीच आहे. मी कुठेच असे म्हटले नाही की, तुम्ही असे केले. मी नक्कीच तुम्ही गायलेले गाणे एकून मोठा झालो. मी बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकलो आहे.

मी तुमचा अत्यंत मोठा चाहता आहे. लव्ह यू…आता या वादावर पडदा पडलेला दिसत आहे. सोनू निगम याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले. मात्र, आता हा वाद मिटल्याचे बघायला मिळतंय. सोनू निगम याने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.